एरंडोल, राष्ट्रीय हरित सेना-सामाजिक वनीकरण विभाग, मातृभूमि सर्वांगीण विकास संस्थेतर्फे कढोली येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये जागतिक ओझोन संरक्षण दिवस साजरा करण्यात आला. संवेदना बहुउद्देशीय संस्थेचे श्री. दिपक पाटील व सहकाऱ्यांनी पथनाट्य सादर केले. मातृभूमि सर्वांगीण विकास संस्थेचे संस्थापक श्री. संजय बडगुजर यांनी पावसाचे पाणी कसे मोजावे याचे प्रात्यक्षिक दिले. वनसंरक्षक श्री. डी.बी.बेंडकुळे, वनपरिक्षेत्र अधिकारी कोमल पिंडकुरवार यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री. सुदाम चौधरी हे होते. सौ. रत्नप्रभा बडगुजर यांनी सुत्रसंचालन केले. या वेळी किरण कमळजा, के.आर.पाटील, वाय. डी.बडगुजर, एस्.आर.पाटील उपस्थित होते विद्यार्थ्यांना हरित सेना सिम्बॉल कॅप(टोप्या) व पेन वाटप करण्यात आले. तसेच वृक्षारोपण देखील करण्यात आले.


Leave a Reply