सौ. रुची दिनेश बडगुजर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – श्री. दिनेश भगवान बडगुजर, ठाणे

Happy birthday to my dearest, loveliest and most beautiful wife Ruchi Badgujar.
प्रिये तू मनमोहिनी अर्धांगिनी,
श्वास माझा, तू माझी स्वामिनी…
मज साथ तुझी जन्मोजन्मी
तू सावित्री अन सत्यवान तुझाच मी
मी राजा तुझा अन तू माझी राणी
तुजविना मी अधूरा तू माझी अर्धांगिनी…
स्वप्न माझे पाहिले मी तुझ्या नयनी
साथ तुझी अखंडित माझ्या जीवनी
स्वप्न होईल पूर्ण सुखाला हो मग कसली कमी
आस माझ्या मनीची प्रिये तू माझी अर्धांगिनी…
स्वर्गसुख आज मागतो अश्रू कदा न तुज नयनी
तुज मिळो सारं काही, दुःखासाठी सदा असो मी
तूच सखी तूच प्रिया तू राधा माझी अन कृष्ण तुझा मी
पूर्णत्व प्राप्त मज तुजमुळे प्रिये तू माझी अर्धांगिनी…
प्रिये तू मनमोहिनी अर्धांगिनी,
श्वास माझा, तू माझी स्वामिनी…
** सौ. रुची दिनेश बडगुजर तुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा. आई मुक्ताई तुझ्या चेहेऱ्यावर असेच कायम हास्य खुलवून ठेवो हीच प्रार्थना.

???????????

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*