दर वर्षा प्रमाणे वर्ष-२०१९ मध्ये घेण्यात आलेल्या मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परिक्षा (एम.टी.एस.ई.) -२०१९ मध्ये कु.गायत्री अरविंद बडगुजर हिने ७२% गुणांनसह केंद्रातुन दुसरा क्रमांक मिळविला. तसेच नाशिक जिल्ह्यामधुन ३२ वा तर महाराष्ट्र राज्यामधुन ४२ वा क्रमांक मिळविला. कु.गायत्री ही मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित अभिनव बाल विकास मंदिर, उत्तमनगर, सिडको. शाखेत इयत्ता तिसरीची विद्यार्थीनी आहे. कु.गायत्री हिला १९ ऑगष्ट २०१९ रोजी मंथन पारितोषिक वितरण समारंभात प्रमाणपत्र, गौरवचिन्ह व धनादेश देऊन गौरविण्यात आले.
कु.गायत्री हिला शाळेतील शिक्षक वृंद तसेच वडिल अरविंद सिताराम बडगुजर, आई सोनल व भाऊ निखिल यांचे मार्गदर्शन लाभले. कु.गायत्री हिचा आजी-आजोबा, काका-काकु, मामा, मावशी यांच्या तर्फे शुभेच्छांचा वर्षाव झाला व पुढील शैक्षणिक वाटचालिस शुभेच्छा दिल्या.
कु.गायत्री हिचे समस्त डांगे परिवार तर्फे खुप खुप अभिनंदन व पुढील वाटचालिस हार्दिक शुभेच्छा..!
अ. भा. ब. स. युवक समिती बडगुजर प्राऊड ग्रुप




अभिनंदन गायत्री..!
असेच यश संपादन करत रहा..
अभिनंदन गायत्री