♦♦♦♦♦♦♦♦♦
सौ. संयोगिता यशवंत बडगुजर यांचा विशेष योगदानाबद्दल सत्कार
दुष्काळाशी झुंज देण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये प्रसिद्ध हिंदी कलाकार अमीर खान यांच्या संकल्पनेतून पाणी फाउंडेशन दरवर्षी वॉटर कप ही स्पर्धा राबवित असते. या वर्षी या स्पर्धेमध्ये बोरखेडा खुर्द तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव या गावाला तृतीय क्रमांक मिळाला. या स्पर्धेमध्ये गावाला मिळालेल्या विशेष सन्मानाचे हिस्सेदार बोरखेडा खुर्द येथील जिल्हा परिषद शाळा शिक्षिका सौ संयोगीता यशवंत बडगुजर यांचेही मोलाचे योगदान मिळाले. त्यांच्या या विशेष योगदानाबद्दल चाळीसगाव पंचायत समिती अध्यक्ष तालुका भाजप अध्यक्ष व जळगाव खासदार श्री उमेश दादा पाटील यांच्या धर्मपत्नीच्या हस्ते पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांना मिळालेल्या पारितोषिका बद्दल त्यांचे अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप यांच्या तर्फे हार्दिक अभिनंदन.
♦♦♦♦♦♦♦♦♦


Leave a Reply