श्री. माधवराव जानकीरामशेठ बडगुजर यांचा अ. भा. ब. स. महासमितीच्या अध्यक्ष पदी विराजमान झाल्याबद्दल सातपुडा बडगुजर समाज मंडळ व महिला मंडळ बोराडी यांच्यातर्फे जाहीर सत्कार

♦♦♦♦♦♦♦♦♦
?????????
श्री. माधवराव जानकीरामशेठ बडगुजर यांचा अ. भा. ब. स. महासमितीच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्याबद्दल सातपुडा बडगुजर समाज मंडळ व महिला मंडळ बोराडी यांच्यातर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. 8 सप्टेंबर 2019 रोजी अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीच्या मासिक सभेत नव अध्यक्ष म्हणून माननीय श्री. माधवराव जानकीरामशेठ बडगुजर यांची निवड करण्यात आली. त्याबद्दल सातपुडा बडगुजर समाज मंडळ व महिला मंडळ बोराडी यांच्यातर्फे बोराडी पंचक्रोशीतील बडगुजर समाजाच्या वतीने आज दि. 10 सप्टेंंबर 2019 रोजी माननीय श्री. माधवराव जानकीराम शेठ बडगुजर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला सत्कार प्रसंगी श्री.नथू नामदेव बडगुजर (जेष्ठ मार्गदर्शक ) श्री. भगवान शंकर बडगुजर (अध्यक्ष, सा.ब.समाज मंडळ बोराडी) श्रीमती सुनंदा विष्णू बडगुजर ( अध्यक्ष,सा.ब.समाज महिला मंडळ बोराडी) श्री.ज्ञानेश्वर नथू बडगुजर, श्री राजेंद्र किसन बडगुजर ,श्री संजय नथू बडगुजर, श्री. टि. टि. बडगुजर सर (सचिव,सा.ब.समाज मंडळ बोराडी) व श्री. चंद्रकांत सुभाष बडगुजर यांनी सत्कार केले. सदर सत्कारप्रसंगी अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
श्री.चंद्रकांत सुभाष बडगुजर यांनी युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप यांच्यावतीने सत्कार केला.
?????????
♦♦♦♦♦♦♦♦♦

श्री. माधवराव अण्णासाहेब यांचा सत्कार करतांना श्री. नथ्थु आण्णा बडगुजर आणि इतर मान्यवर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*