चाळीसगांंव बडगुजर समाज मंडळाने घेतला वनभोजनाचा आनंद – श्री. संदीप बडगुजर, चाळीसगांव

♦♦♦♦♦♦♦♦♦
चाळीसगाव बडगुजर समाज मंडळाने घेतला वनभोजनाचा आनंद
दिनांक 8 सप्टेंबर 2019 वार रविवार रोजी चाळीसगाव बडगुजर समाज मंडळातील समाज बांधव व भगिनींनी एकत्र येऊन पाटणादेवी तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव या देवस्थानी वनभोजनाचा त्याचबरोबर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेतला. वनभोजनासह प्रत्येक छोट्या-मोठ्या कार्यक्रमांमध्ये लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनी उत्फुर्थ सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे सुंदर नियोजन श्री नामदेव वामन शेठ बडगुजर व सुनीता नामदेव बडगुजर व परिवार यांनी केले होते. चाळीसगाव बडगुजर समाज मंडळ हे समाजातील एकीचे प्रतीक आहे. प्रत्येक गावोगावी आपल्या बडगुजर समाजातील बांधवांमध्ये स्नेह निर्माण होण्यासाठी असे उपक्रम प्रेरणादायी ठरतात. चाळीसगाव बडगुजर समाज मंडळ यांच्या प्रत्येक उपक्रमास अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा.
♦♦♦♦♦♦♦♦♦

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*