फागणे येथील ग्रामपंचायत सदस्य श्री. राजेश वसंत बडगुजर यांची उपसरपंच पदी निवड

फागणे गावातील ग्रामपंचायतीचे सदस्य श्री. राजेश वसंत बडगुजर यांची आज दिनांक 7.9.2019 शनिवार रोजी उपसरपंचपदी निवड झाली आहे. उपसरपंचपदी बडगुजर समाजाला प्रतिनिधित्व मिळाल्याबद्दल फागणे बाळापुर गावातील बडगुजर समाजाने आनंद व्यक्त केला आहे. श्री. राजेशभाऊ हे ग्रामपंचायत सदस्य पदी देखील विक्रमी मतांनी निवडून आले होते. ते क्षत्रिय बडगुजर समाज मंडळाचे उपाध्यक्ष देखील आहेत. गेल्यावर्षी आई चामुंडा माता पालखी सोहळा त्यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत नियोजनपूर्वक पार पडला होता. क्षत्रिय बडगुजर समाज मंडळाचे उपाध्यक्ष श्री. राजेश बडगुजर यांची उपसरपंचपदी निवड झाल्यामुळे मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. श्री. राजेन्द्र बडगुजर यांना युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुप तर्फे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

श्री. राजेंद्र वसंत बडगुजर, फागणे

बातमी संकलन – प्रणव कोठवाल सर, फागणे

1 Comment

  1. मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन !!! व
    पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा !!! ?

Leave a Reply

Your email address will not be published.


*