??आनंदाची बातमी??
~~~~~
रोटरी क्लब अॉफ जलगांव वेस्ट आयोजित TEACHERS EXCELLENCE AWARD -2019 नुकताच दिनांक 05 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्ताने रोटरी हॉल ,मायादेवी नगर येथे संपन्न झाला.सदर पुरस्कारासाठी ‘रोटरी क्लब जळगाव वेस्ट ‘ यांचेतर्फे दरवर्षी समाजातील विविध स्तरातील, तळागाळातील घटकांसाठी तसेच वंचित,दुर्लक्षित दिव्यांगजनांसाठी अविरत,उत्तमोत्तम कार्य करणार्या व्यक्तिमत्त्वांचा,शिक्षकवर्गांचा शोध घेऊन निवड करण्यांत येते व 05 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त त्यांचा सन्मान व सत्कार करण्यांत येतो. यंदा आपल्या विवेकानंद प्रतिष्ठान संचालित ,श्रवण विकास मंदिर ,कर्णबधिर विभागातील एकूण 05 शिक्षकमंडळींची निवड करण्यांत आली.यामध्ये मुख्याध्यापक श्री. पद्माकर इंगळे सर, विशेष शिक्षिका खानोरे ज्योती ,श्रीमती. नीलिमा तरवटे,क्रीडा शिक्षिका सौ. अश्विनी कुलकर्णी , कलाशिक्षक गिरीश बडगुजर यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यांत आले.
सदर कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापक माननीय श्री. पद्माकर इंगळे सर यांनी उपस्थितांना श्रवण विकास मंदिर कर्णबधिर विभागातील दिव्यांग विद्यार्थ्यांची शैक्षणिक पद्धत ,अत्याधुनिक शैक्षणिक साधन सामुग्रीचा कुशलतेने केलेला उपयोग,विद्यार्थ्यांचे अभ्यासासोबत कला क्रीडा विषयातील विशेष नैपुण्य ,शैक्षणिक प्रगती व शिक्षणासोबत दिव्यांग विद्यार्थ्यांना पुनर्वसनाकरता पुढील आयुष्यासाठी उपयुक्त असे व्यावसायिक प्रशिक्षण ,विविध उपक्रम या विषयी PPT द्वारे सविस्तर माहिती करून दिली .
कलाशिक्षक गिरीश बडगुजर यांना मिळालेल्या आदर्श शिक्षक पुरस्काराबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचालीस शुभेच्छा.
शुभेच्छूक :
अ. भा. ब. स. युवक समिती
बडगुजर प्राऊड ग्रुप
वेब पोर्टल टिम



Congratulation sir