शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थी कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्यकेल्याबद्द्ल प्रा. डॉ. नितीन बडगुजर यांना राज्यस्तरीय मानवविकास पुरस्कार

आदरणीय पदमश्री. डॉ. तात्यारावजी लहाने, संचालक ,वैद्यकीय शिक्षण व संशोधन, महाराष्ट्र राज्य, शिक्षक आमदार श्री विक्रमजी काळे ,आमदार सतीश चव्हाण व इतर मान्यवरांच्या हस्ते शैक्षणीक, सामाजिक व विदयार्थी कल्याण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय
कार्याबद्दल मानवविकास राज्यस्तरीय पुरस्कार स्विकारतांना प्रा.डॉ.नितीन बडगुजर,जळगाव.

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित, लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय, जळगांव येथील प्रा. डॉ. नितीन बडगुजर यांना दि. १ सप्टेंबर रोजी लातुर येथील मानवविकास राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कारासाठी त्यांनी जळगांव जिल्ह्यातुन विविध शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ठ , उल्लेखनिय तथा विद्यार्थी विकासाभिमुख कार्य करणारे शिक्षक, प्राध्यापकांची जाहिरात देवुन माहिती मागविली होती. त्या सर्व प्रक्रियेतुन जळगांव शहरातुन प्रा. डॉ. नितीन बडगुजर यांची निवड झाली व ऑगस्ट माह च्या द्वितीय सप्ताहात त्यांना या पुरस्काराचे निमंत्रण देण्यात आले होते.

दि. १ सप्टेंबर ला लातुर येथे राज्यस्तरीय मानवविकास या पुरस्काराने प्रा. डॉ. बडगुजर यांना गौरविण्यात आले. धनाजी नाना चौधरी विद्याप्रबोधिनी जळगांव या संस्थेचे अध्यक्ष मा. शिरिषदादा चौधरी, उपाध्यक्ष मा. सुनिल पाटील, सचिव तथा डि. एन. फैजपुर महाविद्यालय येथील प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी आणि सर्व सन्माननीय संचालक यांनी हे वृत्त कळताच बडगुजर सरांचे कौतुक केलेत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय. जी. महाजन तथा सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखिल बडगुजर सरांचे कौतुक करुन अभिनंदनपर भावना व्यक्त केल्यात…

आदरणीय पदमश्री. डॉ. तात्यारावजी लहाने, संचालक ,वैद्यकीय शिक्षण व संशोधन, महाराष्ट्र राज्य, शिक्षक आमदार श्री विक्रमजी काळे ,आमदार सतीश चव्हाण व इतर मान्यवरांच्या हस्ते शैक्षणीक, सामाजिक व विदयार्थी कल्याण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल मानवविकास राज्यस्तरीय पुरस्कार स्विकारतांना प्रा.डॉ.नितीन बडगुजर,जळगाव.

बडगुजर सरांना मिळालेल्या पुरस्काराने आपल्या समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. सर आम्हाला अभिमान आहे आपल्या सारख्या व्यक्तिंचा जे निस्वार्थीपणे समाजकार्य करतात. आपणांस आम्हा युवकांतर्फे मानाचा मुजरा… आपले हार्दिक अभिनंदन…

अ. भा. ब. स. युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुप

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*