वेब पोर्टल टिम तर्फे सेल्फी विथ बाप्पा व सजावट स्पर्धेचे आयोजन – युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुप

www.badgujar.in
एक समाज एक व्यासपीठ

नमस्कार मंडळी,

सालाबादप्रमाणे यंदाही आपण गणेशोत्सव भक्तिभावाने साजरा करण्याच्या तयारीत असलाच… 
चला तर मग… आपल्या घरातील, सोसायटी, गल्ली अथवा मंडळातील गणपतीला आपल्या समस्त समाजापर्यंत पोहोचवूया …

अ. भा. ब. स. युवक समिती , बडगुजर प्राऊड ग्रुप आणि बडगुजर.in वेब पोर्टल आपल्या साठी घेऊन येत आहे एक अनोखी स्पर्धा… 

१. सेल्फी विथ बाप्पा :

यामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या घरातील, सोसायटी, गल्ली अथवा मंडळातील गणपतीसोबत 
आपला आणि आपल्या परिवाराचा सेल्फी/फोटो  पाठवायचा आहे. फोटो सहित स्वतःचे नाव, सोसायटी, मंडळाचे, गावाचे नाव पाठवायचे आहे. 

प्रत्येक स्पर्धकाचा फक्त एक फोटोच ग्राह्य धरण्यात येईल. 

सर्व स्पर्धकांचे फोटो www.badgujar.in वेब पोर्टलवर दाखविण्यात येतील. 

? उत्कृष्ठ ५ फोटोंना बक्षीस देण्यात येईल. 

टीप : स्पर्धेसाठी फोटो निवडतांना फोटो क्वालिटी, प्रकाश, स्पर्धकांचे वेशभूषा, हावभाव इत्यादी लक्षात घेतले जाईल. 

२. सजावट स्पर्धा

यामध्ये २ ग्रुप केले जातील.

२.अ ) घरातील गणपती सजावट स्पर्धा :
फक्त स्वतःच्या घरातील गणपतीचे मखर सजावटीचे फोटो स्पर्धेसाठी पाठवायचे आहेत. तुमच्या घरातील गणपती सोबत काढलेला सर्व कुटुंबाचा फोटो आणि फक्त मखर /सजावटीचा वेगळा असे २ फोटो पाठवायचे आहेत. 

टीप : स्पर्धेसाठी फोटो निवडतांना मखरासाठी वापरलेले साहित्य, कल्पना , प्रकाशयंत्रणा , संदेश या गोष्टी ध्यानात घेतल्या जातील. 

२. ब) सोसायटी अथवा मंडळातील गणपती सजावट स्पर्धा :
स्पर्धकांनी जर एखाद्या मंडळातील किंवा सोसायटी मधील सार्वजनिक गणपती सजावटी मध्ये सहभाग घेतला असेल तरच फोटो पाठवायचा आहे.
गणपती व सजावटी सोबत घेतलेला फोटो व फक्त सजावटीचा वेगळा असे २ फोटो पाठवायचे आहेत. 

टिप : कृपया ज्या मंडळांमध्ये आपला सहभाग नसेल असे फोटो या स्पर्धेसाठी पाठवू नयेत.
स्पर्धेसाठी फोटो निवडतांना मखरासाठी वापरलेले साहित्य, कल्पना , प्रकाशयंत्रणा , संदेश या गोष्टी ध्यानात घेतल्या जातील. 

वरील स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरिता कृपया खालील नंबरवर व्हाट्सअप ने संपर्क करावा :

१) श्री. विजय बडगुजर – 9921107169
२) श्री. धिरज बडगुजर सर – 9767568365
३) श्री. दिनेश बडगुजर – 7709729143

स्पर्धेचा कालावधी : दि. २ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर २०१९.
धन्यवाद.

अ. भा. ब. स. युवक समिती
बडगुजर प्राऊड ग्रुप
वेब पोर्टल टिम

1 Comment

  1. सुंदर कार्यक्रमाचे आयोजन…
    बडगुजर प्राऊड ग्रुप व वेब पोर्टल टीमचे
    मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन !!! ????

Leave a Reply

Your email address will not be published.


*