नाशिक : जिल्हा जम्परोप असोसिएशन आणि महाराष्ट्र जम्परोप असोसिएशन यांच्यातर्फे आयोजित बाराव्या सबज्युनिअर महाराष्ट्र राज्य जम्परोप स्पर्धेस शुभ मंगल कार्यालयात सुरुवात
झाली. मनपाचे माजी स्थायी समिती सभापती राहुल ढिकले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या दोनी दिवसीय स्पर्धेचे उद्घाटन माजी नगरसेवक अनंता सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले.
जम्परोप स्पर्धेत विविध जिल्ह्यांतून ४३० खेळाडू सहभागी झाले आहेत. ३० सेकंड स्पीड, डबल अंडर, तीन मिनीट इंड्युरन्स,
फ्री स्टाइल या चार प्रकारांत स्पर्धा घेण्यात येत असल्याची माहिती विक्रम दुधारे यांनी दिली.
उद्घाटनानंतर ठाणे, पालघर, अमरावती,
जालना, यवतमाळ, नदुरबार
जिल्ह्यांच्या खेळाडूंनी उत्तम खेळ
करून या स्पर्धेत रंगत आणली.
१२ वर्षे : मुली : तीन मिनिटइंड्युरन्स : प्रकारात कु. निधी विजय बडगुजर हीस कांस्यपदक मिळाले. निधी हि अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समितीचे सचिव श्री. विजय संतोष बडगुजर यांची सुकन्या आहे. यापूर्वीही निधीने जम्परोप स्पर्धेत यश संपादन केले आहे. निधीला तिच्या पालकांचे आणि शिक्षक वृंदाचे मार्गदर्शन मिळाले. निधीचे आई-वडील सदैव तिच्या कलागुणांना वाव देऊन तिला प्रेरणा देत असतात.
कु. निधीस मिळालेल्या यशाबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

शुभेच्छुक :
अ. भा. ब. स. युवक समिती
बडगुजर प्राऊड ग्रुप

Congratulations Nidhi and ur Parents ????