जळगाव येथील समाज बांधव श्री उत्तमराव सुदाम शेठ बडगुजर यांच्या नाती आणि श्री विलास उत्तमराव बडगुजर व श्री जितेंद्र उत्तमराव बडगुजर याच्यां मुली कु. कांचन व कु. पायल यांची आंतरराष्ट्रीय साॅप्टबाॅल स्पर्धेत निवड झाली आहे. त्या येत्या नोव्हेंबर मध्ये चीन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय साॅप्टबाॅल स्पर्धेत सहभागी होणार असून भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या दोन्ही बहिणींनी आपल्या बडगुजर समाजाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले आहे.
चीन येथे ३ ते ७ नोव्हेंबरदरम्यान आशियाई मुलींच्या सॉफ्टबॉल स्पर्धा
आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेत भारतीय मुलींचा संघ सहभागी होणार आहे. या संघात महाराष्ट्राच्या ७ मुलींचा समावेश आहे. जळगावच्या कांचन व पायल बडगुजर या दोन्ही भगिनींची निवड करण्यात आली आहे. पायल ही सावखेडा येथील ब. गो. शानबाग विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकत आहे. तर कांचन ही विवेकानंद ज्युनियर कॉलेजमध्ये शिकत आहे. या दोघा खेळाडूंना डॉ. प्रदीप
तळवेलकर, प्रशांत जगताप, केतन कोल्हे यांचे मार्गदर्शन लाभले. या
बहिणींचा आमदार लता सोनवणे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
त्यांच्या या यशस्वी निवड व उत्तुंग भरारी मुळे समाजाचे नावलौकिकात भर पडली आहे, सतत कठीण प्रयत्न, जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर आजची नारी / स्त्री काय करू शकते हे या कन्यांनी समाजाला दाखवून दिले आहे. श्री. विलास बडगुजर व त्यांचा परिवार हे जळगाव येथील मोठे उद्योजक आहेत तसेच ते अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती चे सदस्य असुन नेहमीच समाज कार्यासाठी तत्पर व समाज तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात, युवक समिती तर्फे नेहमीच समाज पूरक व समाज हिताचे कार्य होत असतात आणि फक्त युवक समिती सदस्य कडूनच नाही तर यात त्यांच्या परिवाराचा देखिल काही प्रमाणात हातभार असतो.
खरच कु. कांचन व कु. पायल या दोघीही कन्या समाजासाठी आदर्श आहेत. त्यांच्या या यशाचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आपल्या या यशाबद्दल आपले व आपल्या संपुर्ण परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन व भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा…….. ??
?शुभेच्छुक :-
अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती
व
बडगुजर प्राउड ग्रुप



Leave a Reply