संघटना का वाढत नाही….,?
काही महत्वाची कारणे प्रत्येकाने यात आपण कुठल्या प्रकारात बसतो याचाही विचार करावा
1. तोकडा अभ्यास,सखोल अभ्यास न करता मतप्रदर्शन करणे.वस्तुस्थिती विचारात न घेणे.
2. वर्तमान घडामोडीचे अज्ञान.
3. चळवळीबाबत चिंता आणि तळमळ जास्त परंतु प्रयत्नांत कमतरता.
4. सर्वसमावेशक भूमिकेचा अभाव
5. सांघिक भावनेचा अभाव.
6. वैयक्तिक कामे करण्याची धडपड.
7. संघटनेचे म्हणणे सोईप्रमाणे मानणे.
8. स्वप्नाळू जास्त व वास्तववादी कमी.
9. जिंकू शकतो यांवर विश्वास नसणे.
10. मानापमानामध्ये झुरणे.
11. जबाबदारी स्वीकारायला पुढे न येणे.
12. सुसंवादाचा अभाव.
13. युध्दाच्या वेळी घरी बसणे व युध्द झाल्यावर लढण्याच्या गप्पा मारणे.
14. कामशूर कमी आणि बातशूर जास्त.
15. बोलण्यात आणि प्रत्यक्ष वागण्यात
तफावत असणे.
16. काम करणा-यावर सतत टिका टिपणी करणे, मात्र स्वतः
जबाबदारी न स्वीकारणे.
17. कंफर्ट झोनमध्ये काम करणे.
18. स्वतः चे दैनंदिन रुटिन न बिघडविता बदल करण्याची भाबडी इच्छा बाळगणे…
19. नेतृत्वा कडून मोठ्या अपेक्षा ठेवणे परंतु त्याचे आदेश न पाळणे.
20. सहजशक्य नसलेले ध्येय निवडणे आणि सोपी कामे न करणे.
21. दुस-याकडून त्यागाची अपेक्षा ठेवणे स्वतः मात्र सुरक्षित रहाणे.
22. एकमेकांच्या चांगल्या गुणांचा सम्मान न करणे.
23. आपल्याच विचाराची टिमकी वाजविणे व इतरांनी केलेल्या चांगल्या कामांची दखल न घेणे.
24. आपल्या नेतृत्वा बद्दल आदर न बाळगणे आणि सतत दोष काढत रहाणे.
25. संघटणेच्या कार्यपद्धतीवर विश्वास नसणे.
—————-
श्री. धिरज बडगुजर सर, सोनशेलू ??✊?


माननीय श्री धिरज बडगुजर सर
छान लेखन केलेत. शुभेच्छा !
–डॉ दिलीप-सौ.स्वाती बडगुजर
अमरावती