श्री. सुनिल बडगुजर यांची ज्ञानदा वाचनालयाच्या उपाध्यक्षपदी निवड

उल्हासनगर येथील सामाजिक कार्यकर्ते व बडगुजर उत्कर्ष मंडळाचे  माजी सचिव श्री. सुनिल बडगुजर यांची नुकतीच ज्ञानदा वाचनालयाच्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. अध्यक्ष म्हणून श्री सुरेंद्र सावंत यांची  निवड झाली आहे. ज्ञानदा वाचनालयाची स्थापना 1 डिसेम्बर  1982 साली हिंदू हृदय सम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली होती . हे वाचनालय उल्हासनगर मधील सर्वात जुने  वाचनालय आहे.  वाचनालयात जवळजवळ 8500 पुस्तके आहेत ज्याचा लाभ उल्हासनागरची जनता घेते. हे वाचनालय उल्हासनागरातील मराठा सेकशन कॅम्प क्रमांक 4 येथे आहे. या निवडीबद्दल सुनिल बडगुजर व सुरेंद्र सावंत यांचा सत्कार स्थानिक नगरसेवक शेखर यादव यांनी नुकताच केला. या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा.

शुभेच्छूक : अ. भा. ब. स. युवक समिती बडगुजर प्राऊड ग्रुप

श्री. सुनिल बडगुजर यांची ज्ञानदा वाचनालयाच्या उपाध्यक्षपदी निवडीबद्दल सत्कार करताना नगरसेवक शेखर यादव व अध्यक्ष सुरेंद्र सावंत

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*