स्वतःला ‘म्हातारा’ समजण्यापेक्षा “महा तारा” ? समजावे! – प्रा. सी. डी. साळुंखे सर

स्वतःला’म्हातारा’ समजण्यापेक्षा
“महा तारा” ? समजावे!
———————–
म्हातारपणाला नाव छान??
कोणी म्हणत संन्यासाश्रम!
कोणी म्हणतं वानप्रस्थाश्रम!
मी म्हणतो आनंदाश्रम!!!
म्हातारपणात कसं राहायचं,
घरात असेल तर आश्रमासारखं,
आश्रमात असेल तर घरासारखं,
कशातच कुठे गुंतायचं नसतं,
जुन्या आठवणी काढायच्या नाही,
“आमच्या वेळी” म्हणायचं नाही,
अपमान झाला समजायचं नाही,
उगाच लांबण लावायची नाही,
सुखाची भट्टी जमवत जायच,
साऱ्यांशी दोस्ती जुळवत राहायचं,
राग लोभाला लांब पळवायचं,
आनंद सारखा वाटत जायचं,
म्हातारपण सुद्धा छान असतं,
लेन्स इम्प्लांट ने स्वच्छ दिसतं,
नव्या दातांनी सहज चावता येतं,
कान यंत्राने ऐकू येतं,
पार्कात जाऊन फिरुन यावं,
क्लबात जाऊन पत्ते कुटावं,
देवळात जाऊन भजन करावं,
टी.व्ही. मधल्या सिरियल बघावं,
मुलांसमोर गप्प बसावं,
नातवंडांशी खेळत रहावं,
बायकोबरोबर भांडत जावं,
मित्रांबरोबर बोलत सुटावं,
जमेल तेव्हा टूर वर जावं
बायकोच लगेज सोबत न्यावं,
थकलं तिथेच बसून घ्यावं,
वाटेल तेव्हा उसाचा रस प्यावं,
लायन रोटरी अटेण्ड करावं,
वेळ असेल तर गाण गावं,
एकांतात ठेक्यावर नाचून घ्यावं,
पाहिलं कुणी व्यायाम म्हणावं,
कंटाळा आला झोपून जावं,
जाग आली फेसबुक बघावं,
बघता बघता घोरत राहावं,
टोकलं कोणी वाटसाप उघडावं,
एकटं घरी किचन पहावं,
दुधाची साय गायब करावी,
मुलांचा खाऊ टेस्ट करावा
आलं मनात साखर खावी
जुना शर्ट घालत राहावं,
थोडे केस सावरत राहावं,
आरशालाच बोगस म्हणावं,
कोणी नसल वाकूली करावं,
पोराचा मोबाईल उघडून बघावा,
पासवर्ड असला ठेऊन द्यावा,
डब्बा मोबाइल वापरात राहावं,
बंद पडतो आदळत राहावं,
छान रंगवावी सुरांची मैफल,
मस्त जमवावी जेवणाची पंगत,
सुरेल जुळवावी गप्पांची संगत,
लुटत रहावी जगण्याची गम्मत,
स्वाद घेत, दाद देत,
तृप्त मनानं आनंद घेत ,
हळूच आपण असं निघून जावं,
पिकलं पान गळून पडावं …!!!!
“महा तारा”
?????????

संग्रहित – प्रा. सी. डी. साळुंखे सर, धुळे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*