गुदगत विकारांसाठी लेझर थेरपी वरदान – डॉ. विशाल पगार & डॉ. कमलेश बडगुजर, नाशिक

शिबीर ! शिबीर !! शिबीर !!!

गुदगत विकारांसाठी लेझर थेरपी वरदान – डॉ. विशाल पगार & डॉ. कमलेश बडगुजर, नाशिक

सामान्य व्यक्तीसाठी कुठलाही आजार झाला की मुळव्याध झाले, असा गैरसमज अतिशय सामान्या आहे. शस्त्रक्रियेच्या
भितीपोटी भोंदू डॉक्टर वा वैदूंच्या तावडीत रुग्ण सापडतो. त्यानंतर रुग्ण त्यांच्या दृष्टचक्रात अडकला जातो. नाजूक जागेच्या
चिकित्सेसाठी दुदैवाने वेदना व चिरफाडीच्या भीतीने अनेक लोक भोंदूना निवडतात. आधुनिक तंत्रज्ञाने आता लेझर चिकित्सेमुळे
विनाचिराफाड व विनावेदना उपचार करणे सहज शक्य झाले आहे. त्यामुळे रुग्णही दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी कामावर जाऊ
शकतो.

मूळव्याध हे आता व बाहेर अशा प्रकारचे असते. शौचातून रक्त जाणे, शौचाच्यावेळी हाताला कोंब लागणे, अशी लक्षणे
आढळतात. यात वेदना नसल्यामुळे रुग्ण अनेक महिने बाजार अंगावर काढतात. पहिल्या प्रकारात अधून – मधुन रक्त जाणे,
दुसऱ्या प्रकारात शौचाच्या भागापर्यंत कोंब येतात नंतर ते आपोआप आतमध्ये जातात. तिसऱ्या प्रकारात रक्त जाणे व शौचाच्या
भागाबाहेर कोंब येतात जे बोटाने मध्ये ढकलावे लागतात. चौथ्या प्रकारात कोंब बाहेर राहुन सुजतात व मोठ्या प्रमाणात वेदना
होतात.

फिशर या विकारात वेदना मोठ्या प्रमाणावर असते. तरूण रूग्णांमध्ये हा आजार आढळतो. शौचाच्यावेळी आग होणे व रक्त
जाण्यामुळे अनेक रूग्ण डॉक्टरांचा सल्ला घेतात. प्राथमिक अवस्थेत हा आजार औषधाने बरा होतो. मात्र, फिशर आजारास
अनेक दिवस झाल्यास व वेदना जास्त झाल्यास शस्त्रक्रिया करावी लागते.

भगंदर या विकारात शौचाच्या ठिकाणी सर्वात किचकट व चिकित्सेला अवघड आजार आहे. त्याची चिकित्सा शस्त्रक्रियेनेच
होते. यात शौचाच्या जागेभावेती एक किंवा अधिक केसतोड्यासारख्या पुटकुळ्या येतात व त्या फुटतात. तसेच आपोआप कही
काळ बऱ्या होतात. मात्र, परत परत हा त्रास सुरूच राहतो. यात अनेक यप्रकारे शस्त्रक्रियेचे पर्याय रूग्णांसाठी उपलब्ध अरहेत.

पाईलोकनायडल सायनस या विकारात रूग्णाच्या माकड हाडाजवळ पुटकळी येऊन त्यातून पुयस्त्राव येतो. हा आजार
तरूण पुरुषांमध्ये आढळतो. तसेच काही स्त्रियांनाही हा आजार आढळतो. या आजारात पोळीत केस अडकल्यामुळे रूग्णाला
वेदना होतात. यावर शस्त्रक्रिया केल्यास हा आजार बरा होतो,

मुळव्याध,फिशर,भगंदर व पाईलोनायडल सायनल हे विकार लेझर किकित्सेमुळे कायमचे बरे हातात. त्यामुळे लेझर चिकित्सा
वरदान ठरली आहे. ही लेझर शस्त्रक्रिया एक दिवसाची असून बिनटाक्याची, विना जखम,कमी रक्तस्त्रावाची आहे, यात रूग्णाला
कमी वेदना होतात. त्यामुळे ही प्रभावी पध्दत आहे.

डॉ. विशाल पगार, एम.एस.(शल्यविशारद) जनरल व लेझर सर्जन मूळव्याध व भगंदर तज्ज्ञ

मोफत शिबीर दिनांक : २० ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०१९ वेळ : सकाळी १० ते २

लेखक प्रॉक्टॉकॉन २०१९ या परिषदेमध्ये लेझर सर्जरीचे प्रात्यक्षिक अखिल भारतीय स्तरावर सादर करणारे एकमेव सर्जन आहेत.

डॉ. कमलेश सतिश बडगुजर, नाशिक
मेडिकल डायरेक्टर
समृद्धी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
रोहीणी नगर, पेठ नाका,
भक्तीधाम जवळ, पंचवटी, नाशिक.
मो. नं. – 9096744866

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*