? शुक्रवारी तारीख 16 ऑगस्ट रोजी ही कार्यशाळा घेण्यातआली.
पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचे आवाहन स्वीकारुंन आपला गणपती आपल्या हाताने घडवा, असे आवाहन उमंग बडगुजर नारी मंच तर्फे करण्यात आले. त्या करीता अमरावतीचे सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व भाजप चे प्रदेश प्रवक्ता श्री. शिवराय कुळकर्णी यांच्या कार्यशाळेचे आयोजनकरण्यात आले.
या कार्यशाळेत आपल्या घरी गणपती बसवण्यासाठी मातीचा गणपती आपल्या हाताने घडवून देण्यासाठी व प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे पर्यावरणासाठी हानिकारक असल्याने घरोघरी मातीचाच गणपती बसवण्याचा संकल्प आपण केला पाहिजे. या करीता कार्यशाळेचा आयोजन करण्यात आले व सहभागी होणाऱयांसाठी केवळ लहान मुलेच नाही तर त्यांच्या पालकांनी म्हणजे सर्वांनी मिळून मूर्ती घडवायची असे कळविण्यात आले होते. घरून येताना छोटा लाकडी पाट किंवा फळी सोबत आणावी, जेणे करून तयार केलेली मूर्ती घरी नेणे सोयीस्कर होईल.
*सर्वांना मातीचा गोळा देण्यात आला व अतिशय सुंदर असा फक्त समाजहितासाठी बडगुजर समाजाचा हा कार्यक्रम अमरावती मधील महीलांनी राबवला व अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळाला ह्या कार्यक्रमा साठी विषेश सहकार्य भेरडे ईंशुरंन्सचे धिरज भेरडे यांनी केले हया प्रसंगी भारती अजय दातेराव, राधिका अमर भेरडे,नीलाक्षी नितिन दातेराव, सोनिया राहुल भेरडे व बडगुजर समाजातील महीला भगिनी उपस्थित होत्या.




Leave a Reply