फक्त नोकरीसाठी नव्हे समाजाचे क्रण फेडण्यासाठी शिक्षण घ्या
कुऱ्हेपानाचे येथे अरुण मांडाळकर यांचे प्रतिपादन, निबंध स्पर्धांना प्रतिसाद
विद्यार्थांनी फक्त नोकरी मिळण्यासाठी किंवा व्यवसाय करण्यासाठीच शिक्षण घेऊ नये. तर समाजाची सेवा करण्यासाठी शिक्षणाचा उपयोग करा, असे आवाहन भुसावळ येथील जयगणेश ज्येष्ठ नागरिक संघाचे अरुण मांडाळकर यांनी केले. कुऱहे पानाचे येथील रा. धों. मध्यामिक
विद्यालयात शनिवारी (दि.१०) रोजी कै. राजाराम धोंडू बडगुजर यांच्या १९ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी ग्रामविकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष एकनाथ बडगुजर होते. मुख्याध्यापक डी.डी. पाटीलयांनीही विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. कै.राजाराम धोंडू बडगुजर यांनी शिक्षणाची गरज ओळखून
आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा
प्रवाहित केली. तसेच गाबाबाहेरून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महात्मा गांधी छात्रालय सुरू करुन निवासाची व्यवस्था केल्याचे मुख्याध्यापक पाटील यांनी सांगितले. त्यानंतर पर्यवेक्षक
आर.व्ही.गवळी यांनी मनोगत व्यक्त केले.
रगभरण, निबंध स्पर्धा… यानिमित्त शाळेत रंगभरण तसेच निबंध स्पर्धा घेण्यात आली. कलाशिक्षक संजय चव्हाण, हेमंत बडगुजर व गजानन गायकवाड यांनी स्पर्धेचे नियोजन केले. रंगभरण स्पर्धेत २४० तर निबंध स्पर्धेत ८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. लहान व मोठ्या गटातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
ए.बी.बडगुजर, एस.डी.वाघ, एल.पी.पाटील, ग्रंथपाल सुदर्शन बडगुजर, गजानन गायकवाड, दीपक काळे उपस्थित होते. श्रीराम प्राथमिक विद्यामंदिरचे सर्व शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते. सूत्रसंचालन कलाशिक्षक हेमंत बडगुजर यांनी केले. कार्यक्रमासाठी नरेश बडगुजर, सुनील झारखंडे, राजू बडगुजर, रामकृष्ण पारधे, पुंडलिक धोबो यांनी परिश्रम घेतले.
बातमी संकलन – श्री. हेमंत बडगुजर सर





Leave a Reply