मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे. काही दिवसांपूर्वी माझ्या मैत्रिणीच्या डोळ्याला अचानक खूप सूज आली होती. सर्वांना ती रांजणवाडी वाटत होती. पण ते तसे नव्हते. तिच्या शरीरात अचानक खूप उष्णता वाढली होती. डोळा सूजून, गाल पण पूर्ण सूजला. आणि खूप वेदना होत होत्या. दोन दिवसानंतर तर डोळा पूर्णच बंद झाला आणि त्यातून पस यायला लागले. हे फार भयानक होते आणि जिवघेणेही. कारण तिला डोळ्याच्या आतल्या खोबणीत खूप मोठी गाठ जाणवायची. पण पस मुळे डोळा सतत ठसठस करायचा. आणि विशेष म्हणजे चिकटलेला डोळ्याच्या पापण्या काट्यापेक्षाही टोकदार झाल्या नी सूजलेल्या गालाला लागून टोचायच्या. लहान मुलांसारखे रडायचे ती. हवासुद्धा सहन होत नव्हती तिला. डाॕक्टर पण हैराण. गोळ्या औषधे चालू, शेवटी इंजेक्शन पण चालू केली, पण ते फक्त पेन किलर होते. तेवढ्यापुरते बरे वाटायचे पण औषधाचा असर संपला की तोच प्रकार. खूप हादरले. कारण डोळा 8 दिवसापासून आहे त्याच परिस्थितीत. वेड्यासारख्या गोळ्या चालू. काही मेडीकल टेस्ट केल्या, पण डोळ्याची सूज कणभर पण कमी नाही. वेड्यासारखे सर्वांना विचारत होती काय करावे ते, पण सर्व झाले करून… आणि मग एक आश्चर्य घडले… माझे एक जवळचे ओळखीचे होते. त्यांना विचारणा केली असता बोलता बोलता ते म्हटले “तेवढे बेलाचे पान ठेऊन पहा”… शेवटचा उपाय म्हणून मी मैत्रिणीला लगेच फोन केला व सांगितले. ते ही करू म्हटले. घरच्याच बेलाची 2 पाने घेतली, आणि त्या सूजलेल्या डोळ्यावर ठेवले…. अतिशयोक्ती वाटेल कोणाला… पण हे 100% खरे आहे… पान ठेवल्याबरोबर पाच -पाच मिनीटाला पान ओले व्हायचे. ती पुन्हा पुसून ठेवायची. आणि काय आश्चर्य !!अर्ध्या तासात पुळीतून पस बाहेर यायला लागला. बेलाचे पान ठेवले की पस बाहेर पडायचा. असे करत करत उरलेल्या 3 दिवसातच पूर्ण पस निघून गेला. डोळा एकदम कोरडा. डाॕक्टरांना दाखवले त्यांनाही आश्चर्य वाटले. अर्थात त्यात डाॕक्टरांचे पण योगदान होतेच, पण पस सुटून शरीरातील उष्णता मात्र केवळ बेलाच्या पानानेच गेली..् आपण महादेवांची पिंड थंड रहावी म्हणून त्यावर बेलपत्रच वाहतात. शेवटी आपल्या प्रत्येक धार्मिक गोष्टीमागे विज्ञान आहे हे 100% खरे आहे. माझा यावर विश्वास आधीपासूनच होता पण खात्री पटली ती स्वानुभवावरून.
☘☘☘☘☘☘☘☘

बेल,बेलाचे पान चे महत्व व उपयोग संबंधीची उपयुक्त माहितीll
Valuable information
Thanks Dr. Nikhil for your feedback.