सततच्या पावसामुळे व विषम हवामानामुळे आरोग्याची घ्यावयाची काळजी – डॉ. कमलेश सतिश बडगुजर

सततच्या पावसामुळे व विषम हवामानामुळे flu किंवा स्वाईन फ्लू या आजाराचे रुग्ण जास्त प्रमाणात येत आहेत. ह्या आजाराची माहिती,व तो कसा टाळावे या बद्दल थोडी माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहोत जेणे करून आपण तो आजार टाळु शकतो.
स्वाईन फ्लू म्हणजे काय .?
स्वाईन फ्लू किंवा H१N १ विषाणू ची बाधा होणे

H१N१. VIRUS हा INFLUENZA (FLU) ची नवीन आवृत्ती आहे. तिचा आगमन डुकरामधे होतो, पण त्याचा प्रसार हा एक माणसा पासून दुसऱ्या माणसांमधे होतो.
हा पाहुणा विषाणू, आपल्या विषम हवामानामुळे,आपल्या देशात कायमचाच रहिवासी झाला आहे.हा अतिशय संसर्गजन्य विकार आहे. हा शिंके मार्फत पसरतो . एका शिंकेमधून हजारो फ्लूचे VIRUS हवेत पसरतात.
हे व्हायरस TABLE, दरवाज्याचे कडी ,संघणकाचे माउस, किपेड या वर जमतात जेणे करून ते इतरांना पसरतात.
हस्तादोलन हे पण H१N१. VIRUS पसरण्याचे प्रभावि माध्यम आहे. H१N१. VIRUS च्या रुग्णापासून दुर हा राहाणे व संपर्कनंतर वारंवार साबणाने हात धुणे असे केल्याने आपण संसंर्ग टाळू शकतो.
हा संसंर्ग कोणालाहि घडू शकतो. पण ५ वर्षापेक्षा कमी वयाची मुले, जेष्ठ नागरीक, प्रतिकार शक्ती कमी असलेली व्यक्ती, गरोदर माता दमा, हृद्यविकार, मधुमेह व किडनी विकाराचे रुग्णावर हा आजारा ची शक्यता जास्त असते. गर्दीचे ठिकाणे व प्रवासदरम्यान संसर्ग जास्त प्रमाणात होतो अश्या ठिकाणी जाणे टाळावेत. आपण आजारी असल्यास कामावर किंवा शाळेपासून घरी रहाणे.
शेंबुड, लाळे, शिंके व्दारे हा आजार इतरांना पसरतो.
सर्दी पडशे सारखीची या आजाराची लक्षणे असतात,सर्दी ,थंडी वाजून ताप येणे, घसा खवखवने, अति अंगदुखी, थकवा, उलटी, मळमळ अशी सर्व साधारण लक्षणे असतात .
निदान:-घशातील थुंकीचा SWAB तपासणी साठी पाठवून आपण याची खात्री करू शकतो
Complications (गुंतागुंत):-PNEUMONIA, ARDS, श्वास घेण्यास त्रास होणे, BP कमी होणे, SEPTICEMIA.
उपचार:-स्वाइन फ्लूच्या बर्‍याच घटनांमध्ये उपचारासाठी औषधांची आवश्यकता नसते. आपल्याला फ्लूपासून वैद्यकीय गुंतागुंत होण्याचा धोका नसल्यास आपल्याला डॉक्टरांना भेटण्याची आवश्यकता नाही. आपण आपली लक्षणे दूर करण्यात आणि एच 1 एन 1 चे प्रसार इतर लोकांपर्यंत रोखण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे
हा आजार वेगानी वाढत असल्यमुळे व या विकारासाठी फार काही औषधें नसल्यामुळे, वेळेवर उपचार केल्यानी रुग्णाचा जीव वाचू शकतो.

डॉ. कमलेश सतिश बडगुजर, नाशिक
मेडिकल डायरेक्टर
समृद्धी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
रोहीणी नगर, पेठ नाका,
भक्तीधाम जवळ, पंचवटी, नाशिक.
मो. नं. – 9096744866

डॉ. कमलेश बडगुजर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*