बडगुजर समाजासाठी भूषणावह बाब – धुळे येथील श्री. कौशल अंबादास बडगुजर हा SDRF चा जवान आणि त्याच्या टिमने सांगली क्षेत्रातील पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवितांना अनेकांचे प्राण वाचविले

बडगुजर समाजासाठी भूषणावह बाब

श्री. कौशल अंबादास बडगुजर मुळ गाव धुळे. हुद्दा police constable तुकडी -SDRF यांचे खरोखरच कौतुक करावे तेवढे कमीच आहे. कोल्हापुर सांगली मधे पुराने हाहाकार माजवला असतांना लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम चालू आहे. तिकडेच कौशल बडगुजर यांची ड्यूटी सांगली येथे लागली. ठिकाण सांगली म्हटले तर आताच्या घडीला एकदम भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. अश्या वेळी आपल्या जिवाची तमा न बाळगता आपले कर्तव्य हेच आपले राष्ट्रीय कार्य समजून लोकांना सुरक्षित स्थळी पोहचविण्याचे कार्य कौशल बडगुजर आणि त्यांची टिम करीत आहे. आताच्या पूरपरिस्थिती मध्ये सुध्दा ते मागे नाही हटले.

आपल्या संपूर्ण टिम सोबत बचावकार्य करीत आहेत. बचाव कार्य करीत असतांना एका युवकाचा पाय फेक्चर होता आणि त्याला छाती एवढ्या पाण्यातून सुरक्षित स्थळी नेण्यासाठी कौशल बडगुजर यांने त्या युवकास आपल्या खांद्यावर बसवून सुरक्षित स्थळी पोहचविले. त्याच्या या दिलदार पणाचा सर्व सहकाऱ्यांनी, त्या मुलाच्या नातेवाईक आणि गावकऱ्यांनी कौशलचे कौतुक केले. तसेच जे लोक पुराच्या पाण्यामुळे अडकलेले आहेत त्यांना फुड पॅकेट्स आपल्या खांद्यावर घेऊन लोकांना पुरविले.

प्रत्येक वेळी राज्य राखीव दलाचा हा जवान आपल्या कार्याचा ठसा उमटवून आपले कार्य साध्य करण्यासाठी नेहमीच अग्रेसर आणि तत्पर असतो…

पूरग्रस्तांना फुड पॅकेट्स घेऊन जातांंना

बडगुजर समाजासाठी कौतुकास्पद कामगिरी आज त्यांनी केली. आजच्या पूरपरिस्थिती मध्ये अडकलेले पुर बांधवांना त्यानी आणि त्यांच्या टिमनी छाती पर्यंत आलेल्या पाण्यातून मार्गक्रमण करीत सुरक्षित ठिकाणी पोहचविले.

SDRF Team

अ. भा. ब. स. युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुपचा आपल्या आणि आपल्या टिमच्या कार्यास सलाम. आणि सर्व आपात कालीन मदत करणाऱ्या सर्व जवानांना तसेच महाराष्ट्र पोलिस राखीव दलााच्या सर्व बचावकार्य करणाऱ्या जवानांना आमुचा मानाचा मुजरा. गर्व आहे आम्हास आपला सर्वांचा. मदतकार्य करीत असतांना कुठलाही भेदभाव न बाळगता आपले कार्य यशस्वीपणे राबविले त्याबद्दल आपले मनःपुर्वक धन्यवाद.

श्री. कौशल अंबादास बडगुजर हा SDRF चा जवान सांगली क्षेत्रातील पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवितांना

जनसेवा हिच ईश्वर सेवा

हा बोध दिला आपण समाजास आपला अभिमान वाटतो.

कौशलजी आपण अशीच जनसेवा करावी आणि आपल्या समाजाचे नाव असेच उज्वल करावे.

मित्रांनो आपण घरी बसून फक्त बघत आहोत की काय सुरू आहे पण पोलीस राखीव दलाचे जवान , NDRF ची टिम आणि सर्व प्रशासकीय यंत्रणा अथक परिश्रम घेऊन लोकांना शक्य ती मदत करीत आहेत. आपणही याबद्दल विचार करावा.

2 Comments

  1. खूप छान कार्य, जेव्हा देशावर्ती वाईट वेळ येते नागरिकांवर वाईट वेळ येते तेव्हा तेव्हा आपल्या देशातील जवान सदैव तयार असतात.

Leave a Reply

Your email address will not be published.


*