सविस्तर वृत्त असे की धरणगाव रेल्वे स्थानकावर रोजनदारीने काम करत असले विजय सुरेश रोकडे (होमगार्ड) व स्वप्निल बडगुजर (होमगार्ड)धरणगाव हे दोघ तरुण सकळी स्टेशनवर काम करत असताना सुरत भुसावळ पॅसेंजर मध्ये हरचंद सुकलाल महाजन
जिजाबाई हरचंद महाजन हे एरोडोल येथील प्रवासी धरणगाव येथे 7-30 ला उतरले त्यानी एरोडोल जाण्यासाठी धरणगाव बस स्टँड ला येण्यासाठी रिक्षा केली त्यानंतर ते एरोडोल येथे घरी गेल्यावर वर कळले की बॅग हरवली तब्बल 2 तासानंतर ते धरणगाव येथे स्टेशनवर येऊन तपास केला मात्र त्यांना बॅग मिळत नसल्याने ते आक्रोश करताना पाहून विजय रोकडे व स्वप्निल बडगुजर यांनी विचार पूस केली असता याना रिक्षा चा नंबर सुध्दा माहिती नव्हता परंतु रिक्षावरील फोटो ची आठवण असल्याने या दोघ तरुणांनी संपूर्ण गाव फिरून ती रिक्षा चा शोध घेऊन महिलेस बॅग परत दिली बॅग मिळाल्यावर महिलेने आपले आनंदाश्रू पाहून दोघ तरुण भरवले त्यांनि बक्षीस ही नाकारले परंतु त्या महिलेने दोघ तरुणांना चहापाण साठी एरोडोल येथे बोलवले असता त्या एरोडोल शहराचे विद्यमान नगरसेवक योगेश महाजन यांच्या काकू होत्या योगेश महाजन यांच्या सह संपुर्ण कुटूंबाने दोघे तरुणांचे आभार मानले तर त्याच्या या प्रामाणिकपानाचे धरणगाव शहरातच नव्हे तर एरोडोल येथे कौतुक होत आहे.
आजचा धक्का धक्कीचा जीवनात कोणी कोणालाही मदत करत नाही पण धरणगावातील दोघ होतकरू तरुण यांनी आजही प्रमाणिक पणा शिल्लक आहे याची प्रचिती दिली. विजय रोकडे व स्वप्नील बडगुजर याचे आभार…
अ. भा. ब. स. युवक समिती बडगुजर प्राऊड ग्रुप


आज सुद्धा समाजामध्ये प्रामाणिक लोकां ची कमी नाही, प्रशंसनीय कार्य