धुळे तालुका भा.ज.पा. कार्यकारीणी वर फागणे येथील शाम नंदवाळकर व अमित बडगुजर यांची नियुक्ती…
धुळे तालुका भा.ज.पा. कार्यकारीणी नुकतीच तालुका अध्यक्ष श्री. देवेंद्र पाटील यांनी जिल्हाध्यक्ष श्री. बबनभाऊ चौधरी व श्री. किशोर सिंघवी यांच्याशी विचार विनिमय करून जाहीर करण्यात आली.
भा.ज.पा. धुळे तालुका कार्यकारिणीवर फागणे येथील मा. जि.प. सदस्य स्व. श्री. दिगंबर नाना बडगुजर यांची सुपुत्र व सामाजिक कार्यकर्ते श्री. शाम दिगंबर बडगुजर (नंदवाळकर) यांची तालुका सरचिटणीस पदावर नियुक्ती केली असून अ.भा. बडगुजर समाज नवोदय युवा मंचचे अमितकुमार चंद्रकांत बडगुजर यांची तालुका कार्य. सदस्य कार्यकारिणीवर नुकतीच निवड करण्यात आली आहे.
सदर बडगुजर समाज बंधूची नियुक्ती झाल्या बद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply