फागणे येथील नवोदय युवा मंचचे समाजिक कार्यकर्ते श्री. अमित बडगुजर यांची कन्या कु. श्रेया अमित बडगुजर हिच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त अँम्बीशन्स किड्स शाळेत वृक्षरोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
तसेच विद्यार्थीना गोड पदार्थ देऊन तोंड गोड करण्यात आले.
यावेळी श्री. शाम बडगुजर व अमित बडगुजर यांनी वृक्षारोपण चे महत्व सांगून इतर वायफळ खर्च न करता सामाजिक आदर्श घडेल असा वाढदिवस साजरा करण्यात यावा असा संदेश दिला.
या कार्यक्रमावेळी भा.ज.पा. तालुका सरचिटणीस श्री. शाम दिगंबर बडगुजर, शाळेचे संचालक श्री. दीपक वाघ सर, श्री. प्रवीण मोरे सर, स्वतः कु. श्रेया बडगुजर, नवोदय युवा मंचचे श्री. अमित बडगुजर , श्री. राकेश पाटील या सह विद्यार्थी – पालक व शिक्षकवृंद उपस्थित होते.


Leave a Reply