??।। अभिनंदन व शुभेच्छा ।।??
दि. 28/07/2019 रोजी नंदुरबार येथे बडगुजर समाज उन्नती मंडळ येथे गुणवंत आदर्श विद्यार्थी, जेष्ठ नागरिक व सेवानिवृत्ती सोहळा अतिशय शांत, आनंदी व उत्साहित वातावरणात विद्यार्थ्यांना मान्यवरांनी शैक्षणिक उच्च स्तरीय मार्गदर्शन देऊन प्रमाणपत्र व शैक्षणिक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले तसेच जेष्ठ नागरिक व सेवानिवृत्त, पदोन्नती मिळालेले समाज बांधव यांना सत्कार सन्मानित करण्यात आले.
तसेच कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे यांचा वृक्ष देऊन सन्मान करण्यात आला.
1) कार्यक्रम चे अध्यक्ष मा. आमदार श्री चंद्रकांत रघुवंशी साहेबांनी विद्यार्थी व समाज बांधवांना मार्गदशनात घरातील स्त्रीच मुलाला आदर्श नागरिक बनवू शकते तसेच
विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या आहारी जाऊ नये असे अनेक उदाहरणे देऊन योग्य मार्गदर्शन केले.
2) श्री. सतिष दिगंबर बडगुजर यांनी आपल्या मार्गदर्शनात ” विद्यार्थ्यांनी नौकरी करण्या पेक्षा नौकरी देणारे बना”, व्यवसाय उद्योग क्षेत्रात करिअर करा असे योग्य उच्च स्तरीय व्यावसायिक मार्गदर्शन केले.
3) श्री. दिनेश बडगुजर यांनी विद्यार्थ्यांना करियर करण्यासाठी कसे नियोजन करावे त्यासाठी इतिहासातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे नियोजन कसे होते आणि शैक्षणिक करियर मॅनेजमेंट असे उच्च स्तरीय मार्गदर्शन दिले.
4) श्री. रमाकांत पुंडलिक बडगुजर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे करियर कसे निवडावे व यांची माहिती उदाहरणासह दिली आणि ” करियरच्या विविध वाटा “
इयत्ता 10 वी व 12 वी करियर गाईडन्स, व
डिप्लोमा, डिग्री, व पदवीधर उच्च पदवीधर. सामान्य परीक्षा सह MPSE, UPSE परीक्षा मार्गदर्शन माहिती.
या माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
अशी माहिती लिंक वर उपलब्ध करून दिली.
5) श्री. केतन बडगुजर, अहमदाबाद यांनी विद्यार्थ्यांना इंजिनिअर व मेडिकल व आय आय टी क्षेत्रातील तसेच UPUSC, MPUSC परीक्षा विषयीं मार्गदर्शन केले.
6) श्री. भगवान बडगुजर यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना सामाजिक दृष्टीकोनातून शिक्षणाचे शैक्षणिक उपयोगी महत्त्व पटवून दिले.
7) श्री. सुनील नंदवाळकर यांनी पालकांनी जबाबदारी शैक्षणिक जबाबदारी, विद्यार्थांची जिद्द, प्रेरणा, प्रामाणिकता व गुरुजनांचे योग्य मार्गदर्शन विषयी उपयुक्त मार्गदर्शन केले.
8) श्री. सुनील रमेश बडगुजर व श्री कैलास बडगुजर यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक योग्य मार्गदर्शन केले.
तसेच आदी मान्यवरांनी ही विद्यार्थी पालक यांना ही शैक्षणिक विषयावर उपयुक्त मार्गदर्शन केले.
दर वर्षी उन्नती मंडळ असे कार्यक्रम करून विद्यार्थी व समाजाची खरोखरच नावाप्रमाणेच उन्नती करत आहे.
नंदुरबार शहरातील बडगुजर समाजाचे विद्यार्थी यांचे खूप खूप अभिनंदन व पालकांचे ही अभिनंदन.
तसेच आमच्या मुंबई उत्कर्ष मंडळाच्या पदाधिकारी यांना या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले त्याबद्दल आम्ही आपले बडगुजर समाज उन्नती मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचे खूप खूप आभार विशेष श्री दिलीप भाऊ बडगुजर व श्री विजय बडगुजर यांचेही खूप खूप आभार.
बडगुजर समाजातील विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
धन्यवाद?
सचिव
बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ,
मुंबई


जबरदस्त आयोजनll
आयोजकांचं हार्दिक अभिनंदनll