आला सुसाट वारा
सोबती पाऊस धारा
कोरड्या धरेला आज
चिंब भिजवूनी गेला
……. संपली विरह वेदना
चाहूल हळवी ओली
पडता पाऊल धरती
ती क्षणात बहरूनी गेली
ओंजळीत भरभरून मोती
सोडले असे भू वरी
गंधाळून गेली अवनी
मिलनात विलीन झाली
ओल्या मातीचा कुशीत
बीज कोवळे रूजले
सर्वत्र मऊ मखमलीचे
पसरले हिरवे गालिचे
लेवुन हिरवा साज
त्यासाठी सजली धजली
आनंदे नभात बिजली
चमकली घेऊन गिरकी
…….. आनंदी आनंद हा असा
दश दिशात शोभूनी उरला
पुन्हा परतूनी येण्याचा
वादा करूनी गेला ….
सौ . माधवी किशोर बडगुजर
अलिबाग


Leave a Reply