नोकरी करणारे नाही तर नोकरी देणारे बना – श्री. सतिष डिगंबर बडगुजर, मुंबई

घरातील स्त्रीच आपल्या मुलाला आदर्श
नागरीक बनवू शकते-आ.चंद्रकांत रघुवंशी
बडगुजर समाज उन्नती मंडळातर्फे विद्यार्थी गुणगौरव समारंभ
नंदुरबार-विद्यार्थ्यांनी मोबाईल व सोशल मीडियाच्या आहारी न जाता अभ्यासात चांगली प्रगती करावी. मोबाईलच्या अतिवापरामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. घरातील स्त्रीच आपल्या मुलाला आदर्श नागरीक बनवू शकते. यामुळे आईने आपल्या मुलाकडे काळजीपूर्वक लक्ष दिले पाहीजे, असे प्रतिपादन विधानपरिषद सदस्य आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केला. येथील बडगुजर समाज उन्नती मंडळातर्फे आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभ प्रसंगी आ.चंद्रकांत रघुवंशी बोलत होते. यावेळी ९५ विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.
येथील लोकमान्य टिळक वाचनालयाच्या सभागृहात दि.२८ जुलै २०१९ रविवार रोजी दुपारी २.३० वाजता बडगुजर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, समाजातील पदोन्नती, सेवानिवृत्त तसेच विशेष प्राविण्यप्राप्त समाज बांधवांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.चंदक्रांत रघुवंशी हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून अ.भा.ब.समाज महासमितीचे उपाध्यक्ष भगवान बडगुजर, रिलायंस जिओ इन्फोकॉम लि.मुंबईचे व्हा.प्रेसिडेंट दिनेश बडगुजर, मुंबईचे उद्योजक सतिष बडगुजर, नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल नंदवाळकर, बडगुजर उत्कर्ष मंडळ, मुंबई सचिव रमाकांत बडगुजर, औरंगाबाद येथील सामाजिक कार्यकर्ते सुनिल बडगुजर, धुळे युवक समितीचे अध्यक्ष अनिल बडगुजर, धुळे युवक समितीचे सदस्य गोकुळ बडगुजर, भावनगर येथील गव्हर्मेंट इंजिनिअर कॉलेजचे डॉ.केतन पी. बडगुजर, औरंगाबादचे बडगुजर समाज अध्यक्ष कैलास बडगुजर, हर्षल बडगुजर, अशोक बडगुजर, धुळे येथील सुधीर बडगुजर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात चामुंडा माता प्रतिमापुजन व दिपप्रज्वलनाने झाली. झाडे लावा-झाडे जगवा या संदेशातून मान्यवरांचा सत्कार कुंडीतील रोपटे देवून करण्यात आला. यानंतर विशेष प्राविण्यप्राप्त ८ व गुणवंत ८७ अशा एकुण९५ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व फोल्डर फाईल देवून गौरविण्यात आले. येथील प्रमोद तुकाराम बडगुजर यांनी विद्यार्थ्यांसाठी भेटवस्तू (फोल्डर फाईल) उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. तसेच शहरात नवीन वास्तव्यास समाज बांधवांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी रिलायंस जिओ इन्फोकॉम लि.मुंबईचे व्हा.प्रेसिडेंट दिनेश बडगुजर म्हणाले, की कुठल्याही नियोजनाशिवाय माणूस आयुष्यात प्रगती करु शकल नाही. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांने आपल्या जीवनात नियोजनानुसार अभ्यासाला महत्त्व दिले पाहीजे. त्यानुसारच आपण उच्चशिक्षण घेवू शकतो. मुंबईचे उद्योजक सतिष बडगुजर म्हणाले, की नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा, नोकरीचा हट्ट न धरता व्यवसायाकडे वळले पाहीजे. कुठलाही व्यवसायात शंभरटक्के नुकसान नसते. मोठमोठ्या उद्योजकांची उदाहरणे देवून उजोकताविषयी मार्गदर्शन केले. तर पोलीस निरीक्षक सुनिल नंदवाळकर म्हणाले, की मुलांना आपल्या घरातूनच संस्कारांचे बाळकडू मिळत असते आणि त्यातूनच मुलांचे व्यक्तीमत्त्व घडत असते. पालकांनी आपल्या घरातील आहार-विचारांचे वातारण शुद्ध कसे टिकून राहील, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. बडगुजर उत्कर्ष मंडळ, मुंबई सचिव रमाकांत बडगुजर यांनी स्पर्धा परीक्षाविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष विजय बडगुजर यांनी केले.त्यात त्यांनीमंडळाचा इतिहास सांगितला, तसेच मंडळ घेत असलेल्या कार्यक्रमांबद्दल माहिती दिली, मागच्या वर्षी विद्यार्थ्यांना दिलेल्या रोपांचे आम्ही स्वतः जाऊन पाहणी केली तर पुष्कळ वृक्ष जगले आहेत असे सांगितले,पुढील काळात मंडळ वृक्षारोपण मोहीम राबविणार तसेच पर्यावरण पूरक गणपती मूर्ती बनविण्यासाठी एक कार्यशाळा आयोजित करेल असे सांगितले .सूत्रसंचालन दिलीप बडगुजर यांनी केले तर आभार मंडळाचे सचिव अश्‍विन बडगुजर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंडीत बडगुजर, भाईदास बडगुजर, रविंद्र बडगुजर, दिनेश बडगुजर, देविदास बडगुजर, विजयकुमार बडगुजर, संदीप बडगुजर, गणेश बडगुजर, भरत बडगुजर, प्रकाश बडगुजर, विलास बडगुजर आदींनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमातील काही क्षणचित्रे

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*