कु. निशा राजेंद्र जाधव (बडगुजर) हिस शिक्षणासाठी मदतनिधी मिळणेबाबत – श्री. संजय जगन्नाथ बडगुजर यांचे आवाहन

व्दारा – कु. निशा राजेंद्र जाधव (बडगुजर)
वडिलांचे नांव – राजेंद्र पुरुषोत्तम बडगुजर मो. ५३२६९६०७१७
रा.कढोली, ता.एरंडोल, जि.जळगाव ह.मु. जळगाव
दि. २४/०७/२०१९

प्रती,
आदरणीय सर्व माझे बडगुजर समाज बांधव

विषय :- शिक्षणासाठी मदत निधी मिळणे बावत….
आपल्या बडगुजर समाजातील सर्व समाज बांधवाना नम्र विनंती आहे की, माझे बी.एस्सी. – (मायक्रोबायोलॉजी) पर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले असून मला अंतिम परीक्षेत ७२% गुण मिळालेले आहेत.
तसेच पुढील शिक्षण एम.एस्सी. साठी मु.जे.महाविद्यालय, जळगाव येथे बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व्दारा विना अतुदानित वर्गासाठी प्रवेश निश्चित झालेला आहे. आमचे कुटुंब मुळचे कढोली
: येथील रहिवासी असून सध्या माझे वडील हे जळगाव येथे एका अपार्टमेंटमध्ये वॉचमन म्हणून काम करतात. तर भाऊ शिक्षणा सोबत बाहेर काम करीत आहे. वडिलांच्या उत्पन्नातून आमचा घरखर्च भागविला जातो.
आमची परिस्थिती हलाकीची असतांनाही माझ्या वडिलांनी मला आजपर्यंत शिक्षणापासून वंचित ठेवले नाही. ‘एम.एस्सीला विना अनुदानीत वर्गामध्ये प्रवेश निश्चित झालेला असल्याने २ वर्षासाठी जवळपास मला शैक्षणिक फी साठी ७०००० रु. खर्च येणार आहे. मात्र माझ्या वडिलांकडे पुरेसे पैसे नसल्याने पुढील शिक्षण होणे शक्‍य नाही. त्यामुळे मी शिक्षणापासून वंचीत राहील. माझी पुढील शिक्षण घेण्याची इच्छा आहे तरी मी आपल्या सर्व समाज बांधवांनी कृपया मला शिक्षणासाठी मदत निधी द्यावा. माझे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी समाजाचे ऋण निश्चित पणे फेडेल याची ग्वाही देते.

बँक तपशील – कु. निशा राजेंद्र जाधव, बॅक ऑफ महाराष्ट्र, एम. जे. कॉलेज शाखा, जळगाव, खाते क्र. ६०१७९४५०९९२ IFSC code: MAHB001161
संपर्क व्यक्ती – श्री दिलीप महारु बडगुजर, जळगाव – मो. ९४०३४७८९४ १, ७०८३३६९०९६
श्री. संजय जगन्नाथ बडगुजर, जळगाव मो ९४२२७७८७६८
कळावे.
आपली विश्वासू
कु. निशा राजेंद्र जाधव (बडगुजर).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*