गावाला मोफत पाणीपुरवठा करणा-या आदर्श देवदूताचा सरपंच ज्ञानेश्वर बडगुजर यांच्या हस्ते सत्कार

गावाला मोफत पाणीपुरवठा करणा-या आदर्श देवदूताचा ग्रामपंचायततर्फे सत्कार
पिंपळकोठा बु.।। ता. एरंडोल : – येथे दुष्काळ स्थितीमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई असतांना गावाला देवदूतासारखी मदत करुन नियमित मोफत पाणीपुरवठा करणारे शेतकरी श्री. ईश्वर पुंडलिक पाटील व त्यांचे सुपुत्र श्री. चंद्रकांत ईश्वर पाटील यांचा ग्रामपंचायतीतर्फे आज सत्कार करण्यात आला. त्यांचा सत्कार ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. ज्ञानेश्वर महादू बडगुजर यांनी केला. तसेच यावेळी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी समयोचित भाषण केले. सत्कार समारंभी श्री. आर. के. पटाईत, ग्रामविकास अधिकारी, तसेच सरपंच श्री. ज्ञानेश्वर महादू बडगुजर, उपसरपंच श्री. प्रकाश पुंडलिक पाटील, ग्रामपंचायत सदस्य श्री. साहेबराव जालम पाटील, श्री. दत्तू लकडू बडगुजर, सौ. बेबाबाई अशोक बडगुजर, सौ. नंदादीप किशोर बडगुजर, सौ. शमीमबी युसुफअली सैय्यद, श्रीमती खैरुन्निसा अय्युबखान मन्यार, श्रीमती सुकमाबाई भगवान भिल व श्री. अशोक राजाराम बडगुजर, किशोर बाबुराव बडगुजर, राजेंद्र बाबुलाल पाटील, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी श्री. बाळु सुरसिंग पाटील, श्री. ऋषिकेश रमेश पाटील, श्री. शरद शामराव बडगुजर, श्री. अरुण शामराव भिल तसेच आपले सरकार सेवा केंद्रचालक पुरुषोत्तम गुजर हे उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*