प्रतिष्ठा फौंडेशन आयोजित स्त्री सन्मान सोहळा रविवार 4 ऑगस्ट 2019 रोजी सांगली येथील टिळक स्मारक भवन येथे दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी आयोजित केला आहे.
जागतिक कीर्तीच्या जेष्ठ समाज शास्त्रज्ञ व इतिहासकार मा. गेल यांच्या हस्ते हा स्त्री प्रतिष्ठा सन्मान पुरस्कार प्रदान केले जाणार आहे.
महाराष्ट्र राज्याच्या विविध भागातील कर्तृत्ववान महिलांचा या पुरस्कार सोहळ्यात सन्मान करण्यात येणार आहे.
उद्योजिका या क्षेत्रातील नाशिक येथील मा. सौ. मनीषा सुरेश बडगुजर यांना प्रतिष्ठा फाउंडेशन तर्फे उद्योजिका सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
त्या नाशिक येथील सावी आर्ट अँड क्राफ्ट क्लासेस च्या संचालिका आहेत. त्या आपल्या संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांना विविध प्रकारची प्रशिक्षणे देत असतात. सौ मनीषा ताईंना जाहीर झालेल्या पुरस्कार ही समाजासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.
सौ मनीषा ताईंचे अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप तर्फे खूप खूप अभिनंदन व भावी वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.

“हार्दिक अभिनंदन”
हार्दिक अभिनंदन