जळगाव जिल्हा पोलीस दलातील ७ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी काढले. त्यात अमळनेरचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांची रामानंद नगर पोलीस स्टेशन, जळगांव येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावा या अनुषंगाने जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीत पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक यांच्या प्रशासकीय बदल्यांबाबत चर्चा करण्यात आल्या नंतर यावलचे निरीक्षक दत्तात्रय बडगुजर यांची सायबर पोलीस स्टेशनला, बदली करण्यात आली आहे ,धरणगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक अंबादास मोरे यांची अमळनेर पोलीस स्टेशनला बदली करण्यात आली

Leave a Reply