गुरुपौर्णिमेनिमित्त गुलाबबाबा भक्त मंडळातर्फे अन्नदान वाटप

गुरुपौर्णिमेनिमित्त गुलाबबाबा
भक्त मंडळातर्फे अन्नदान वाटप
नंदुरबार-येथील मराठा गल्लीत गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून श्री सिद्धेश्‍वर संत गुलाबबाबा भक्त मंडळ सदस्य रविंद्र काशिनाथ बडगुजर यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नंदुरबार शहर पोलीस निरीक्षक सुनिल नंदवाळकर यांच्या हस्ते श्री सिद्धेश्‍वर संत गुलाबबाबा यांच्या प्रतिमेचे पुजन करुन महाप्रसाद वाटप करण्यात आला.
कार्यक्रमास दिलीप राघो बडगुजर, काशिनाथ फकिरा बडगुजर, विजय संतोष बडगुजर, पंडीत तोताराम बडगुजर, भाईदास दगा बडगुजर, दिनेश शामराव बडगुजर, देविदास भगवान बडगुजर, अश्‍विन भालचंद्र बडगुजर,श्यामबापू मराठे, भाईदास पटेल, भानुदास लोहार, रविंद्र चौधरी, महेंद्र काशीनाथ बडगुजर, गुलाब माळी, राजु वसावे, शिवा वसावे, चंदू वसावे, गुलाबबाबा भक्तमंडळ धानोरा, पिंपळोद, कोठली, नटाव, रनाळे, तळोदा, नंदुरबार येथील भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*