EWS सवलतीमुळे आता मिळवा केंद्रात 10% आरक्षण ! – श्री. मोहन हिरालाल बडगुजर, डोंबिवली

ll श्रीगजानन प्रसन्न ll

??खुशखबर??

आता केंद्रात 10% आरक्षण मिळवा !

    बडगुजर समाजातील सर्व समाज बंधू भगिनींना खुशखबर देत आहोत की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी जानेवारी 2019 पासून आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या म्हणजेच वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तर आपण या सवलतीचा लाभ घेऊ शकतात अनेक महिन्यापासून अनेक समाज बांधवांचे आम्हास केंद्रात केव्हा ओबीसी मिळणार व केंद्रातील नोकरीत व शिक्षणात केव्हा आरक्षण मिळणार असे विचारले जाते आम्ही त्यावर उत्तर देत असतो की महाराष्ट्र राज्यात आपल्याला ओबीसी मिळाले आहे. त्याचा लाभ आपण सर्व घेत आहोत. केंद्रामध्ये काही महिन्यानंतर आपल्याला ओबीसी *सवलत* मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न ओबीसी समिती मार्फत आम्ही करीत आहोत. अनेक वेळा दिल्ली येथे जाऊन आमचा प्रयत्न जोरात सुरू आहे. परंतु आपण सध्या केंद्रांमध्ये मिळत असलेल्या *10%* राखीव जागांच्या सवलतीचा लाभ केंद्रातील कुठल्याही प्रकारच्या नोकरीसाठी व शिक्षणासाठी घेऊ शकतात. याचे क्रियाशील उदाहरण म्हणजेच अमरावतीचे *डॉ. दिलीप धोंडू बडगुजर* यांनी प्रत्यक्षात *10%* आर्थिक निकषावर केंद्रातील मिळणाऱ्या *सवलतीचा* लाभ घेऊन इतर समाजाला त्याचा लाभ व्हावा यासाठी त्यांनी कसे व कुठे प्रयत्न करून केंद्राच्या सवलतीसाठी प्रमाणपत्र मिळविले त्याचा तपशील आम्ही त्यांच्या *आवाजात प्रमाणपत्रासह* सोबत माहिती देत आहोत त्याचा लाभ सर्व समाज तरुण-तरुणींनी, बंधू-भगिनींनी घ्यावा असे निवेदन करीत आहोत. 
  *डॉ. दिलीप धोंडू बडगुजर* यांनी अथक प्रयत्न करून प्रमाणपत्र मिळवून *स्वतःकडे न ठेवता* मोठ्या मनाने समाजाचे कल्याण व्हावे हे मोठे ध्येय ठेवले त्यामुळे आम्ही त्यांचे *कौतुक करून जाहीर अभिनंदन* करीत आहोत. असेच पुढे आपल्या हातून समाजकल्याणकारी कार्य घडो ही *शुभेच्छा* !

श्री. मोहन हिरालाल बडगुजर
सदस्य – अ. भा. ब. स. ओबीसी समिती
अध्यक्ष- अखिल भारतीय बडगुजर समाज कल्याण समिती व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याकडून पुनश्च अभिनंदन.

???????

श्री. मोहन हिरालाल बडगुजर

1 Comment

  1. EWS चा समाजबांधवांनी उपयोग केला पाहिजे. माझे अपत्यांना सध्यातरी या प्रमाणपत्राची आवश्यकता नव्हती. पण नुकतेच हे धोरण केंद्र शासनाने ठरवल्यामुळे मी हे प्रमाणपत्र मिळवले-असो जवळ ;या हेतूने. वर्षभरात कदाचित कधीतरी कामी पडू शकेल म्हणुन. अशाच विचाराने समाजाने मिळवून घ्यावे ; ही सूचना करतो.याची व्हलिडिटी एक वर्ष असते.

Leave a Reply

Your email address will not be published.


*