माझं ठिक आहे,
पण….
हि पृथ्वी कोणाच्या शोधात
फिरत आहे…..कोणाच्या भेटीची ओढ लागली आहे बरं
तीला….
कधी कधी ती मला अस्वस्थ वाटते तर कधी कधी बेभान होवुन
स्वतःलाच वादळांच्या हावाली
करते…उध्वस्त होण्यासाठी.
शेवटी….काय करणार भावनांचा उद्रेक झाला म्हणजे….ह्दयात
कालवाकालव होणारच…मग मनाला तडे जाणारच….पश्चा
त्तापाच्या कंपनांचे धक्के स्वताच्या आस्तित्वाला देत आपली
फिरण्याची गती कायम ठेवणे सगळ्यांना थोडेच जमतं….
खरंच….का फिरत असेल बरं पृथ्वी .
तीला आपल्या मनातल सांगायचं असेल का कोणाला….
आठवणींचा ज्वालामुखीय जखमा
तीनं का बरं जपून ठेवल्या असतील.
आयुष्याच्या भरती ओहोटीत अगदी जीवाभावाची माणसं
दुरावली याचं दुःख तर तिला नसेल….
खरंच…
माझं ठिक आहे….पण
का फिरत असेल ही पृथ्वी…..
कोणाला शोधत फिरत असेल हि पृथ्वी…..
कोणाच्या भेटीची ओढ लागली असेल बरं तिला….
दिपक बडगुजर..
९०२१९५३१९३


Leave a Reply