मोठ्या दिलाच हा राजा राजर्षी शाहूमहाराज …. होते प्रजाहितदक्ष, सामाजिक, संस्थानिक, कला, उद्योग, व्यापार, जनजागृती जनक.
राजर्षी शाहू महाराजा….. मोठ्या …..
कोल्हापुरात मल्ल विद्येला दिला राजाश्रय …..
चिरस्थायी गुणी कलावंत, होते प्रिय सारे हे दृष्य,
गुणी बाबुराव पेंटर, अल्लादिया गणमहर्षी.
उपकृत उपक्रम राबवत राजर्षी
राजर्षी शाहूमहाराजा….. मोठ्या…..
होते महात्मा फुले, थोर बाबासाहेब आंबेडकर,
जीवन मराठी मानवाचे, झाले सुखकर प्रखर.
होती अंधश्रद्धा देशभर, अशिक्षित होते लाखावर,
अन्यायाला वाचा फोडण्याचा, होता शाहूंचा कैवार.
राजर्षी शाहूमहाराजा….. मोठ्या…..
दलितांच्या कल्याणासाठी, कळवळ हि होती मोठी,
सामाजिक, आर्थिक दृष्ट्या, दुर्बल समाजासाठी.
बाणा अमुचा हा मराठी, आम्ही जातिवंत हो घाटी
शास्त्रशुद्ध आधुनिक तो, शाहुंचीच तो दुरद्रीष्टी
राजर्षी शाहूमहाराजा….. मोठ्या…..
कवी,
हेमंत बडगुजर
९८८१७०९२०२
कलाशिक्षक रा. धो. माध्य, विद्यालय, कुऱ्हे (पा)

Leave a Reply