तुषार भगवान बडगुजर या युवकाने रक्तदान करून वाचविले दोन प्राण

मुंबई येथील नेरळ येथे प्रसुती साठी आलेल्या महिलेस ऐन प्रसुती वेळी रक्त साठा ४% इतका कमी असल्यामुळे तिची परिस्थिती गंभीर होती. अशा परिस्थितीत तिची प्रसुती होणे पण कठीण होते.

त्याचवेळी तुषार बडगुजर यांना क्षितिज हास्पिटल, नेरळ येथून फोन आला आम्हाला बी पॉजिटिव्ह ब्लड बॅग लागत आहे. त्यावेळेस मुंबईमध्ये फक्त साठा कुठेच उपलब्ध नव्हता. इकडे तिकडे चौकशी केली असता एका ब्लड बँक मध्ये एक पिशवी आहे अशी माहिती मिळाली. मग त्या ब्लड बँकेला फोन करून याविषयी चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितले की तुषार आमच्याकडे B +ve पॉझिटिव्ह रक्तगटाची एकच बॅग आहे पण ती दुसऱ्या पेशंटने बुकिंग केलेली आहे. तर मी त्यांना लगेच बोललो माझे ब्लड ग्रुप पण B +ve आहे. तर त्यांनी सांगितले तू येऊन रक्तदान कर आम्ही तुला ही बॅग देतो. एका क्षणाचाही विचार न करता तुषारने रक्तदान करण्याचा निर्णय घेतला आणि ती रक्ताची बॅग घेऊन लगेचच कल्याण ते नेरळ केवळ तीस मिनिटांत गाठून त्या महिलेचे प्राण वाचवले. त्या महिलेचे नाव सौ. प्रतिभा भंगारे आहे व आता तिची प्रसुती होऊन आई आणि बाळ दोन्ही सुखरूप आहेत.

तुषार बडगुजर हे मुळचे पाचोरा येथील आहे. सध्या ते बदलापुर ला राहतात आणि ब्लड बँकेत नोकरी करतात.

तुषारच्या या कार्यास नातेवाईक, मित्र परिवार आणि समाजातून कौतुक केले जात आहे.

तुषारच्या या कार्यास आमुचा सलाम…

अ. भा. ब. स. युवक समिती
बडगुजर प्राऊड ग्रुप

रक्तदान = श्रेष्ठदान

रक्त दान करतांना तुषार बडगुजर
तुषार बडगुजर

1 Comment

  1. वाव्व् ! रक्तदान हे महादानाचे काम असून तुषार बडगुजर यांनी महादान करुन दोन जीवांना जीवनदान दिले.हार्दिक अभिनंदन.
    दानात दान रक्तदानl
    रक्तदान देई जीवनदानll
    रक्तदात्यास मिळे सन्मानl
    कारण तो देतो जीवनदानll
    म्हणूनच रक्तदान ठरते सर्वश्रेष्ठदानl
    आरोग्य सुधरवत असते प्रत्येक रक्तदानll
    प्रत्येक तीन महिन्यांनी करा रक्तदानl
    प्रत्येकाचे आद्य कर्तव्य रक्तदानll
    *ll”रक्तदान महाश्रेष्ठ अन् सर्वश्रेष्ठादान”ll*

Leave a Reply

Your email address will not be published.


*