अ. भा. बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राउड ग्रुपचा स्तुत्य उपक्रम
???????????
???????????
? *वृक्षारोपण महाअभियान* ?
*पर्यावरण रक्षण व पर्यावरण संवर्धन*
—-एक तरी झाड लावूया पर्यावरण रक्षण करूया
समाज बांधवांनो,
मे महिन्यात वर्तमानपत्र उघडले तर सगळी कडे कडक उन्हाळा, तापमानात वाढ, दुष्काळ अश्या बातम्या वाचायला मिळतात…… सर्वजण बातम्या वाचून हळहळ व्यक्त करतात, परंतु ती दूर करण्याकरीता सर्व स्तरातून होणारे प्रयत्न, निराशा यामुळे जागतिक तापमान वाढत चालले आहे.
त्याच अनुषंगाने अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राउड ग्रुप, जून / जुलै महिन्यात समाजिक उत्तरदायित्व म्हणुन, वृक्षारोपण कार्यक्रम व सिड बॉल वाटप कार्यक्रम आयोजित करणार आहे. फक्त वृक्ष लागवड करायचीच नाही तर त्यांचे योग्य रीत्या संगोपन ही करायचे आहे जेणेकरून हा फक्त कार्यक्रम नसावा तर तो पर्यावरण पूरक व पर्यावरण रक्षणासाठी फायदेशीर ठरावा. तरी आपला समाज असलेल्या प्रत्येक गावातील सर्व समाज बांधवांना विनंती आहे की, पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी बडगुजर समाज वृक्षारोपण महाअभियानात सहभाग नोंदवून एक समाज बांधव एक झाड लावूया व त्यास जागवू या
???????????
झाडाविना ढग गेले
ढगाविना पाऊस गेला
पाऊसाविना पाणी गेले
पाण्याविना दुष्काळ पडला
इतका अनर्थ एका वृक्षतोडीने ओढवला।
पाणी वाचवा-वाचवा झाडेl
पर्यावरण संवर्धना हवीत झाडेll
???????????
बडगुजर समाज वृक्षारोपण महाअभियान
? *आयोजक* ?
? अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती
? बडगुजर प्राऊड ग्रुप
???????????
???????????

वृक्षरोपणाची कल्पना अत्यंत महत्वाची आणि सध्यस्थितीची अत्यावश्यक बाब आहे.१५जुलैतें१५आॕगष्ट दरम्यान वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेस अनुकूल वातावरण ठरेल.
ll शुभम् भवतूः ll
अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राउड ग्रुप यांचा वृक्षारोपण महाअभियान हा कार्यक्रम आपण निसर्गाचे काही देणे लागतो या भावनेने व आपल्या भावी पिढीसाठी काहीतरी द्यायचे या उदात्त हेतूने हे महाअभियान हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अश्या या महाअभियान कार्यक्रमास मनःपूर्वक शुभेच्छा.
कुणीतरी पूर्वी झाड लावले होते म्हणुन आज आपण त्याचा उपभोग घेत आहोत, परंतु आपण आपल्या भावी पिढीला काय देणार आहोत विचार करा ??
? चला एक तरी झाड लावूया पर्यावरण रक्षण करूया ?
आज वट सावित्री पोर्णिमा ll
सावित्री-सत्यवान कथा वाचा व वृक्षाचे महत्व जाणाll
वटवृक्षाचे महत्व व वट णजे वड या वृक्षापासूनचे फायदे जाणा आणि प्रत्येकाने आपल्या घराच्या परीसरांत,काॕलननीत वडाचे झाडा लावाll
एकच प्रतिक्रिया?
कृपया अभियान राबवायचा असेल तर प्रत्येकाच्या सहभागाची,प्रतिक्रियेची तथा प्रतिसादाची आववश्यकता आहे याची सर्व मान्यवरांनी नोंद घ्यावी.