*बडगुजर समाजातील युवक करताय डिजिटल युगाकडे वाटचाल….*
अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राऊड यांच्या संयुक्त वैचारिक जुळणीतून *एक समाज एक व्यासपीठ* या ब्रीद वाक्या खाली badgujar.in या वेबसाईटची निर्मिती केली व बडगुजर समाजाचे नाते डिजिटल युगाशी जोडले .पारोळा येथील भव्य महिला मेळाव्यात वेबसाईटचे लोकार्पण करण्यात आले. आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या या वेबसाईटने बडगुजर समाजा व्यतरिक्त अन्य समाजातून देखील कौतुकाची दाद मिळवली.
सध्या वेबसाईटला भेट देणार्यांची संख्या वाढली असून आता वेबसाईट बनविणाऱ्या युवक टिमने ज्या ठिकाणी बडगुजर वस्ती आहे अशा गावात शहरांमध्ये वेब प्रतिनिधी नेमण्याचे ठरविले आहे. सदर वेब प्रतिनिधी प्रशिक्षणाची कार्यशाळा दिनांक 26 मे 2019 रोजी क्रॉम्प्टन हॉल, सावता नगर सिडको, नाशिक याठिकाणी सकाळी 10:00 ते दुपारी 3:00 या दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. सदर प्रशिक्षणास प्रतिनिधी म्हणून ज्यांना काम करायची इच्छा असेल अशा समाज बांधवांनी कार्यक्रमास आवश्य उपस्थित राहावे. ??


Leave a Reply