बोदवड येथे निलेश फिटनेस जिम च्या स्थापनादिनानिमित्त शरीरसौष्ठव स्पर्धा

बोदवड : निलेश फिटनेस जिमच्या स्थापना दिनानिमित्त येथील निलेश फिटनेस जिम चे मालक संदीप बडगुजर यांच्या वाढदिवसानिमित्त व त्यांचे सहकारी प्रदीप मेलांदे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्तरीय भव्य शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोशिएशन मुंबई व जळगाव जिल्हा बॉडी बिल्डर्स असोशिएशन जळगाव यांच्या मान्यतेने निलेश फिटनेस जिम बोदवड येथे जिल्हा स्तरीय भव्य शरीर सौष्ठव स्पर्धा घेण्यात आली जळगाव येथील पोलीस दलात कार्यरत व बोदवड येथील रहिवासी व मिस्टर एशिया साठी निवड झालेले रवींद्र वंजारी यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

शरीर सौष्ठव स्पर्धेत बोदवड, भुसावळ ,वरणगाव ,जळगाव रावेर , पाचोरा येथील स्पर्धक सहभागी झाले होते.
निलेश फिटनेस बोदवड – विजेता अनिस शेख ११००० हजार रुपये बक्षीस, जिगर फिटनेस पॉईंट भुसावळ – जित गिरी ५ हजार रुपये, श्रीसई बजरंग जिम जळगाव – मोस्ट इम्पृव्ह विजेता इरफान खान ३ हजार
यांना विजेते घोषित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिओम जैस्वाल, नगराध्यक्ष सईद बागवान, मधु राने, विजय बडगुजर होते उदघाटन जळगाव जिल्हा बॉडी बिल्डर्स अध्यक्ष मोहन चव्हाण होते. मिस्टर एशिया साठी निवड
झालेले रविंद्र वंजारी यांनी तरुणांना शरीर नियमित व्यायामाद्वारे कमावण्याचा सल्ला दिला, यशस्वीतेसाठी संदीप बडगुजर, प्रदीप मिलांदे, जयदीप शेळके,किरण विसपुते, लखन चौधरी, चेतन अग्रवाल, सतीश भुतळा, विजय बडगुजर,अनिल खंडेलवाल, कैलास चौधरी, दिनेश माळी, संजय गायकवाड, संजय वराडे व निलेश फिटनेस जिम चे सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*