साकळी ता.यावल – नेत्रदानाचे महत्त्व समजून घेत नियतीच्या नियमाने आपण हे जग सोडून गेल्यानंतर आपले डोळे पुन्हा कोण्या व्यक्तीच्या माध्यमातून हे जग पाहू शकतील. ही भावना समोर ठेवत साकळी येथील एका सर्वसामान्य अशा लहान स्वरूपाच्या व्यावसायिकाने मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केलेला आहे. रघुनाथ माधव बडगुजर असे या युवकाचे नाव असून त्यांच्या नेत्रदानाचा संकल्प बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत सविस्तर असे की,साकळी ता.यावल येथील मनवेल रोडवरील प्लॉट भागातील रहिवाशी रघुनाथ माधव बडगुजर हे रोज संध्याकाळी चौकात अंडा गाडी लावून आपला कौटुंबिक चरितार्थ भागवीत आहे. बडगुजर हे अतिशय सर्वसाधारण व गरीब कुटुंबातील असून ते त्यांच्या आई-वडिलांचे एकुलते एक सुपुत्र आहे. व आपल्या प्रेमळ व सोज्वळ स्वभावामुळे अनेकांचे चाहते आहेत. त्यांची आई गेल्या अनेक वर्षापूर्वी मयत झालेली असून वडील अर्धांगवायूच्या आजाराने ग्रस्त आहे. परंतु परिस्थितीशी हार न मानता पत्नी व मुले यांच्या मदतीने रघुनाथ बडगुजर हे आपला व्यवसाय करतात. व्यवसाया दरम्यान नजरेस पडलेल्या एका अंध व्यक्तीची अवस्था किती केविलवाणी व मन सुन्न करणारी असते नव्हेतर त्या व्यक्तीस जीवन जगणेही कठीण होऊन बसते. ही भावना बडगुजर यांना स्वस्थ बसू देत नव्हती तथापि आपण गरजू अंध व्यक्तींसाठी नेत्रदान करून एखाद्या अंध व्यक्तीच्या डोळ्यासमोरचा प्रकाश बनू शकतो असा निश्चय त्यांनी केला. तेव्हा बडगुजर यांनी वेळात वेळ काढून जळगाव येथील केशव प्रतिष्ठान व आर.सी. बाफना यांच्या मांगीलाल बाफना नेत्रपेढीत जाऊन आपल्या नेत्रदान संकल्प पूर्ततेसाठी फॉर्म भरून घेत मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केलेला आहे.
माणूस मेल्यानंतर त्याच्या शरीरासह संपूर्ण अवयवांची राख होऊन जाते. परंतु आता विज्ञानाच्या जोराने मरणानंतर मानवी इतर काही अवयवांबरोबर डोळेसुध्दा गरजवंताला देता येतात व आपले जीवन सार्थक बनते. ही भावना लक्षात घेऊनच माझ्या मरणोत्तर नेत्रदानाच्या संकल्पामुळे कोणाच्यातरी जीवनात प्रकाश येईल याचा मला मनस्वी आनंद आहे. इतरांनाही अवयव दान करण्याची प्रेरणा मिळेल व तशी गरजही आहे. अशी भावना बडगुजर यांनी व्यक्त केली आहे.
श्री रघुनाथ माधव बडगुजर यांचा विचारांना आणि कार्याला मानाचा मुजरा.
शुभेच्छुक – अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप



Leave a Reply