बडगुजर समाजाचे अष्टपैलू व्यक्तिमत्व श्री मोहन हिरालालशेठ बडगुजर (डोंबिवली)

बडगुजर समाजाचे अष्टपैलू व्यक्तिमत्व श्री मोहन हिरालालशेठ बडगुजर (डोंबिवली)

आपण सर्व समाज बांधव श्री मोहन बडगुजर यांना एक उत्तम स्पष्टवक्ता म्हणून ओळखतो. बडगुजर समाजासाठी ते सामाजिक क्षेत्रात देखील काम करतात तसेच राजकीय व्यासपीठावर ही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवून यशस्वी झाले आहेत. सरकारी नोकरीत असताना ते कामगारांच्या प्रश्नांसाठी त्यांचे हक्काचे मागण्यांसाठी ते कामगार चळवळीत अग्रेसर राहिले.

सेवानिवृत्तीनंतरही ते एक यशस्वी व्यावसायिक म्हणून कार्यरत आहेत. असा जीवनाचा प्रवास चालू असताना त्यांनी आपल्या छंद व आवड याकडे मुळीच दुर्लक्ष केले नाही.

आणखी एका क्षेत्रात ते आपले मन रमवत असतात ते म्हणजे कलाक्षेत्र. त्यांचा हा कलाकारी पैलू आजपर्यंत माहीतच नव्हता. ते उत्तम गायकही आहेत. बडगुजर समाजाच्या ग्रुप वरच्या ऑडिओ क्लिप (हिंदी चित्रपटातील गीतांच्या) आल्या आहेत, त्या श्री मोहन शेठ यांनी गायली आहेत. त्यांच्या आवाजात एक महान गायक लपलेला आहे.

अशा या गायकास व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी दिनांक ७ मे अक्षय तृतीया च्या शुभ दिनी डोंबिवली येथील रेजन्सी रेसिडेन्सीच्या हिरवळीत आपले भूषण गाणसेन पंडित मोहन बडगुजर यांच्या गाण्याच्या भरगच्च तीन तासांचा कार्यक्रम आयोजन सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत करण्यात आले होते.

अशा हरहुन्नरी अष्टपैलू व्यक्तिमत्व लागलेल्या श्री मोहन शेठ यांचे खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा.                                                      शुभेच्छूक – अ. भा. ब. समाज युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुप

1 Comment

  1. हरहुन्नरी अष्टपैलू व्यक्तीमत्व श्री.मोहन हिरालाल शेठ यांना व त्यांचे कार्यास मानाचा मुजराll
    समाजसेवेसांठी आपणास उदंड आयुष्य लाभोll

Leave a Reply

Your email address will not be published.


*