बडगुजर समाजाचे अष्टपैलू व्यक्तिमत्व श्री मोहन हिरालालशेठ बडगुजर (डोंबिवली)
आपण सर्व समाज बांधव श्री मोहन बडगुजर यांना एक उत्तम स्पष्टवक्ता म्हणून ओळखतो. बडगुजर समाजासाठी ते सामाजिक क्षेत्रात देखील काम करतात तसेच राजकीय व्यासपीठावर ही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवून यशस्वी झाले आहेत. सरकारी नोकरीत असताना ते कामगारांच्या प्रश्नांसाठी त्यांचे हक्काचे मागण्यांसाठी ते कामगार चळवळीत अग्रेसर राहिले.
सेवानिवृत्तीनंतरही ते एक यशस्वी व्यावसायिक म्हणून कार्यरत आहेत. असा जीवनाचा प्रवास चालू असताना त्यांनी आपल्या छंद व आवड याकडे मुळीच दुर्लक्ष केले नाही.
आणखी एका क्षेत्रात ते आपले मन रमवत असतात ते म्हणजे कलाक्षेत्र. त्यांचा हा कलाकारी पैलू आजपर्यंत माहीतच नव्हता. ते उत्तम गायकही आहेत. बडगुजर समाजाच्या ग्रुप वरच्या ऑडिओ क्लिप (हिंदी चित्रपटातील गीतांच्या) आल्या आहेत, त्या श्री मोहन शेठ यांनी गायली आहेत. त्यांच्या आवाजात एक महान गायक लपलेला आहे.
अशा या गायकास व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी दिनांक ७ मे अक्षय तृतीया च्या शुभ दिनी डोंबिवली येथील रेजन्सी रेसिडेन्सीच्या हिरवळीत आपले भूषण गाणसेन पंडित मोहन बडगुजर यांच्या गाण्याच्या भरगच्च तीन तासांचा कार्यक्रम आयोजन सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत करण्यात आले होते.
अशा हरहुन्नरी अष्टपैलू व्यक्तिमत्व लागलेल्या श्री मोहन शेठ यांचे खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा. शुभेच्छूक – अ. भा. ब. समाज युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुप

वाहतूक सुरक्षाविषयक अतिमहत्त्वाच्या सभेत व्यासपीठावर श्री. मोहन बडगुजर यांच्यासोबत चला हवा येऊ द्या चे स्टार श्री. भाऊ कदम साहेब व सर्व पोलीस अधिकारी दिसत आहेत. 
मुंबई येथील मातोश्री बंगल्यावर जाऊन हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना एका अपघातात सहाय्य करणारे आपले धडाडीचे समाज नेते श्री. मोहन हिरालाल बडगुजर हे त्या घटने विषयी अगदी जवळून प्रदीर्घ चर्चा करत असतानाचे ऐतिहासिक छायाचित्र. 
समाजाला केंद्रात ओबीसी मिळावे यासाठी आपले अष्ट मंडळाचे समाजाचे शिष्टमंडळ माननीय नामदार भारताचे राज्यमंत्री श्री. रामदासजी आठवले साहेब यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांच्याशी प्रदीर्घ चर्चा करून लवकरात लवकर समाजाला केंद्रात ओबीसी मिळावे यासाठी मागणी करण्यात आली. 
अग्रेसर महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शुभेच्छापत्र देत असतांना श्री. मोहन हिरालाल बडगुजर हे छायाचित्रात दिसत आहेत. 
बडगुजर समाजाला केंद्रात ओबीसीत स्थान मिळावे यासाठी समाजाचे शिष्टमंडळ दिल्ली येथे गेले असताना श्री. मोहन बडगुजर यांचे मित्र मा.खासदार किरीट भाई सोमय्या यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेताना श्री. मोहन हिरालाल बडगुजर सौ. रत्नाताई बडगुजर श्री. पी आर बडगुजर सर श्री. एस एम बडगुजर श्री. राजेंद्र भालचंद्र बडगुजर श्री. अशोक सिताराम बडगुजर श्री. सुभाष हिरालाल बडगुजर श्री. दिगंबर बडगुजर छायाचित्रात दिसत आहेत. 
आपले अ.भा. समाज कल्याण चे नेते श्री. मोहन हिरालाल बडगुजर ओबीसीच्या व्यासपीठावर केंद्रांमध्ये बडगुजर समाजाला ओबीसी मिळवण्यासाठी हजारोच्या संख्येत आझाद मैदानावर भाषण देत असताना छायाचित्रात दिसत आहेत.

अष्टपैलू व्यक्तीमत्व श्री. मोहन हिरालाल शेठ बडगुजर

हरहुन्नरी अष्टपैलू व्यक्तीमत्व श्री.मोहन हिरालाल शेठ यांना व त्यांचे कार्यास मानाचा मुजराll
समाजसेवेसांठी आपणास उदंड आयुष्य लाभोll