कुर्हे पानाचे येथील रा.धों. माध्यमिक विद्यालयातील कलाशिक्षक हेमंत निंबा बडगुजर, यांना जिव्हाळा बहुउद्देशीय आणि युवाशक्ती या दोन सामाजिक संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांना जिव्हाळा संस्थेचा समाज रत्न आणि युवाशक्ती संस्थेचा समता रत्न या पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. अशा आशयाचे पत्र साहित्यभूषण महेश मुळे यांच्याकडून हेमंत बडगुजर यांना नुकतेच प्राप्त झाले आहेत. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कुर्हे पानाचे येथील ग्रामविकास मंडळाचे चेअरमन मा. आप्पासाहेब एकनाथराव राजारामशेठ बडगुजर व श्री. सुनील रघुनाथशेठ कोतवाल यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला. सर्व शिक्षकवर्ग आणि बडगुजर समाज बांधव यांच्यासह अनेकांनी त्यांचे कौतुक केले.


बातमी संकलन – दिनेश बडगुजर, पारोळा

हेमंत बडगुजर यांचे हार्दिक अभिनंदनl
जिव्हाळा कडून पुरस्कार मिळणे म्हणजे जिव्हाळापूर्वक सन्मानll
युवाशक्ती कडून पुरस्कार म्हणजे शक्तीपूर्वक सन्मान lll