पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील श्री. रवींद्र श्रावणशेट कोतवाल (बडगुजर) यांचे जेष्ठ चिरंजीव कल्पेश हा व्हीजेटीआय मुंबई येथे विद्युत अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाला शिक्षण घेत आहे.
चि. कल्पेशने *गेट-२०१९* परीक्षेत ९२.६७% गुणांसह संपूर्ण भारतात २७ व्या क्रमांक घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे.
चि कल्पेशने अतिशय प्रतिकुल परिस्थितीत उच्च शिक्षण घेत यशाचे शिखर गाठले आहे. कल्पेश हा लहानपणापासून अतिशय हुशार व कठोर परिश्रम घेत आहे. शालान्त तसेच उच्च शालान्त परीक्षेत देखील कल्पेशने विशेष प्राविण्य मिळालेले आहे.

कल्पेशच्या यशात त्याची आई सौ. छाया व वडील श्री रवींद्र बडगुजर यांचा सिंहाचा वाटा आहे. चि. कल्पेश हा कै. श्रावण बळीरामशेट बडगुजर व पाचोरा येथील श्री आप्पासाहेब मधुकर रामदासशेट बडगुजर यांचा नातू आहे.
चि. कल्पेशला भविष्यात भारतातील महारत्न शासकीय उद्योगांमध्ये देश सेवा करण्याचा मानस आहे.

Leave a Reply