श्री.भूपेश दौलतराव बडगुजर यांची सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन, ऑफ मुंबई सदस्यपदी निवड.

धुळे – श्री.भूपेश दौलतराव बडगुजर यांची सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन मुंबई च्या सदस्य पदी स्तुत्य निवड झाली आहे. भूपेश बडगुजर हे ना.डॉ.सुभाष भामरे यांचे खंदे समर्थक आहेत. ना.डॉ.सुभाष भामरे यांच्या आशिर्वादाने हि संधी मिळाली आहे.श्री.भूपेश दौलतराव बडगुजर यांच्यावर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा धुळे महानगर चे सरचिटणीस पदाची जबाबदारी आहे. सामाजिक क्षेत्रात कायम अग्रेसर असणारे भूपेश बडगुजर हे नवे उभरते युवा नेतृत्व असून त्यांना मिळालेल्या या संधीचा ते कार्यक्षमतेने वापर करून न्याय देतील.
त्यांच्या या सुयोग्य निवडीबद्दल ना.डॉ.सुभाष भामरे, संरक्षण राज्यमंत्री, प्रा.प्रदीप अडसूळ, पंकज अग्रवाल, गजेंद्र अंपळकर, शांताराम पाटील, डॉ.पंकज महाले, सुरेश वाणी, ऍड. मुकेश पाचपुते, ऍड. गणेश पाटील, ऍड.विवेक सूर्यवंशी, डॉ.तुषार चव्हाण, महेश बागुल, सुशील खंडेलवाल, संजय भारस्कर आदींनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

खासदार संपर्क कार्यालयात भूपेश बडगुजर यांचा सत्कार करताना संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे. शेजारी प्रा. प्रदीप अडसूळ. 

श्री. भुपेश बडगुजर यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

शुभेच्छूक : अ. भा. बडगुजर समाज युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुप

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*