अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती,
कार्यालय – बडगुजर विद्याप्रसारक मंडळ, ७, भुषण कॉलनी, जळगाव.
दि. २१/०४/२०१९
कार्यकारिणी सभेचा अजेंडा
प्रति,
मा. सौ. ________________________________
आपल्या अखिल भारतीय बडगजर समाज महासमितीच्या कार्यकारिणीची सभा महासमितीचे अध्यक्ष श्री. उमेश हिरालाल करोडपती यांचे अध्यक्षतेखाली रविवार दि. ०५/०५/२०१९ रोजी सकाळी १०:०० वाजता खालील दिलेल्या पत्त्यावर जळगाव ता.जि. जळगाव येथे खालील विषयावर विचार विनिमय करुन निर्णय घेण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे.
सभेचे विषय :
१) मागील सभेचे प्रोसिडींग वाचून कायम करणे,
२) सन १८-१९ या आर्थिक वर्षाच्या जमा-खर्चास मंजुरी देणे,
३) सन २०१७-१८ व २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे लेखा परीक्षण करणेकरीता, लेखा परीक्षकाची नेमणूक करणेबाबत,
४) पारोळा येथे झालेल्या महिला मेळाव्याचा इतिवृत्तात व अहवाल सादर करणे,
५) येणाऱ्या वर्षात वधू-वर परिचय पुस्तिका अखिल भारतीय बडगुजर महासमितीच्या अंतर्गत तयार करणेबाबत विचार विनिमय करणे,
६) विविध समितीच्या कामकाजाचा आढावा घेणे.
७) मा. अध्यक्ष सो यांचे परवानगीने आयत्यावेळच्या विषयांवर चर्चा करणे,
टिप – १) कोरम अभावी सभा तहकूब झाल्यास अर्धा तासाने त्याचठिकाणी विषय सुची प्रमाणे घेण्यात येणार आहे. त्यास कोरमचे बंधन राहणार नाही.
(सभास्थळी भोजन व्यवस्था केली आहे).
२) सभेस वेळेवर उपस्थित रहावे ही विनंती.
- सभेचे ठिकाण व वेळ *
रविवार, दिनांक ०५/०५/२०१९ रोजी सकाळी १०.०० वाजता
बडगुजर विद्या प्रसारक मंडळ, ७, भूषण कालनी।
गिरणा पाण्याच्या टाकी जवळ, जळगाव जि. जळगाव ।
? अ भा. बडगुजर समाज महासमिती?
श्री. उमेश आप्पा करोडपती – अध्यक्ष,
श्री. भगवान शेठ बडगुजर, उपाध्यक्ष,
श्री. राजेंद्र बडगुजर, सचिव.


अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती कार्कायरिणी सभेस मनःपूर्वक शुभेच्छाll.
सदर सभेत समाज हिताचे निर्णयासांठीही मनःपूर्वक शुभेच्छाll