मतदान सेल्फी अभियानास बडगुजर समाजाचा उत्स्फुर्त प्रतिसाद

www.badgujar.in
एक समाज एक व्यासपीठ

संविधान आणि लोकशाहीचे महापर्व असलेल्या या लोकसभा निवडणुकीत प्रत्येकाने मतदान करायलाच पाहीजे. मतदानाविषयी जनजागृती निर्माण व्हावी आणि आपल्या बडगुजर समाज बांधव-भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अ.भा.बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राऊड तर्फे ‘मतदार राजा जागा व्हो, लोकशाहीचा धागा हो ’ या शिर्षकाखाली मतदान सेल्फी अभियान राबविले आहे. या अभियानाला बडगुजर समाजाकडून सर्वत्र उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. या अंतर्गत आपल्या बडगुजर समाजाच्या बडगुजर वेब पोर्टलवर मतदाता सेल्फी या पेजवर मतदान केल्याचे सेल्फी फोटो अपलोड करण्यात आले आहेत.
दि.२३ एप्रिल २०१९ रोजी तिसर्‍या टप्प्यात महाराष्ट्रातील जळगांव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, बारामती, अहमदनगर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातगणगले, माढा, पुणे तसेच गुजरातसह आदी राज्यात मतदान झाले. यावेळी आपल्या बडगुजर समाजातील ज्येष्ठ नागरीक, तरुण-तरुणी, नवीन मतदार आदींनी मोठ्या संख्येने मतदान करून या मतदान सेल्फी अभियानास प्रतिसाद देवून आपले मतदान केल्याचे फोटो व्हॉट्सवर पाठविले. या सर्वांचे फोटो आपल्या वेब पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहेत.
त्यांनी आपले फोटो पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा किंवा व्हिजीट करा आपल्या हक्काचे वेब पोर्टल www.badgujar.in वर.

यापुढेही समाज बांधवांकडून असाच प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती

बडगुजर प्राऊड ग्रुप

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*