किनगाव येथे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डच्या विविध जागांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा 28 एप्रिल रविवार

किनगाव येथे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड च्या एक लाखापेक्षा अधिक जागांसाठी ची मार्गदर्शनपर कार्यशाळा 28 एप्रिल रविवार रोजी आयोजित करण्यात आली आहे

प्रमुख मार्गदर्शक -मा.श्री.खेमचंद्र पाटील सर (रेल्वे आणि बँकिंग विभाग प्रमुख तसेच बुद्धिमत्ता चाचणी ह्या पुस्तकाचे लेखक आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील नामांकित आणि तज्ञ मार्गदर्शक)

डांभुर्णी आणि किनगाव परिसरातील सर्व गावांतील तरुण मुला-मुलींसाठी अत्यंत महत्वाची सूचना खालील पोस्ट काळजीपूर्वक वाचा .

येत्या रविवारी दिनांक 28 एप्रिल रोजी ,किनगाव ता- यावल ,येथे राम मंदिर हॉलमध्ये रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड तसेच एनटीपीसी बोर्ड यांच्या मिळून एक लाखपेक्षा जास्त जागांची जाहिरात आलेली होती आणि आपल्या ग्रामीण भागातील बऱ्याच विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज केलेला आहे.

जिल्ह्याभरातील ग्रामीण मुलांसाठी दीपस्तंभ फौंडेशन ने जळगाव येथे 12 एप्रिलला अशा प्रकारची मार्गदर्शनपर कार्यशाळा ठेवली होती परंतु अनेक कारणांनी आपल्या गाव आणि परिसरातील तरुण मुले या सेमिनारला येऊ शकली नव्हती आणि म्हणून आम्ही या कार्यशाळेचे आयोजन आपल्या परिसरातील सगळ्यांना यायला जमेल अशा किनगाव या ठिकाणी केलेला आहे

अत्यंत महत्त्वाच्या मार्गदर्शन कार्यशाळेचा लाभ किनगाव आणि डांभुर्णी या परिसरात राहतात असलेल्या सर्व तरुण मुलांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*