नंदुरबार-शासन प्रशासन तथा सामाजिक संघटनांच्या मतदान जनजागृतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील बडगुजर समाज महिला मंडळातर्फे घरोघरी जावून मतदान जनजागृती अभियान राबविले जात आहे.
सतराव्या लोकसभेची निवडणूक खर्याअर्थाने लोकशाहीच्या महाउत्सवाचा जागर करणारी ठरत आहे. यंदा भारत निवडणूक आयोगाने मतदार जनजागृती मोहीम राबवून ‘स्वीप ऍक्टिविटी’ अंतर्गत विविध स्पर्धा, उपक्रम राबवून सोशल मीडिया आणि घंटागाडीद्वारे प्रचार तसेच मोठ्या प्रमाणात रांगोळी स्पर्धा घेऊन मतदान जनजागृतीसाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु काही लोकांसाठी मतदानाचा दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस समजला जातो. या दिवशी मतदानाकडे दुर्लक्ष करत आपल्या मित्रांसोबत अथवा कुटुंबासोबत सहलीचा अथवा दुसरेकाही नियोजन करण्याचा त्यांचा बेत असतो. अशातच नागरीकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती निर्माण व्हावी आणि जास्तीत जास्त नागरीकांनी मतदान करावे, या उद्देशाने बडगुजर समाज महिला मंडळाच्या सदस्यांकडून मतदान जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. संविधान आणि लोकशाहीचे महापर्व असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान कराच, अशी जागृती मतदारांमध्ये करण्यात येत आहे. या अभियानात मंडळाच्या अध्यक्षा सौ.सुनिता मनोज बडगुजर, उपाध्यक्षा सौ.पौर्णिमा अनिल बडगुजर, सचिव सौ.रेणुका शरद बडगुजर, खजिनदार सौ.प्रिती गिरीष बडगुजर, सल्लागार सौ.वैशाली कैलास बडगुजर, सौ.स्वाती मिलिंद बडगुजर, सदस्या सौ.अनिता भटू बडगुजर, सौ.किरण संजय बडगुजर, सौ.संगिता आबा बडगुजर आदींनी सहभाग नोदंविला आहे. आतापर्यंत शहरातील हुडको कॉलनी, बिजासनी कॉलनी, कोकणी हिल, नाकोडा नगर आदी भागात जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.




नंदनगरीतील बडगुजर समाज महिलाl
मतदान जागृतीत नंबर लावला पहिलाll
भारत देशाच्या संकल्पपूर्तीचा मंत्र वाहिलाl
घरोघरी जाऊनी मतदान अभियान राबविलाll
स्वीप ॲक्टीव्हिटी अंतर्गत घेऊनी विविध स्पर्धा-योजनाl लोकशाही व संविधान जतनसांठी पुढाकार घ्या मतदानाll
नंदनगरीतील बडगुजर समाज महिलाl
मतदान जागृतीत नंबर लावला पहिलाll
भारत देशाच्या संकल्पपूर्तीचा मंत्र वाहिलाl
घरोघरी जाऊनी मतदान अभियान राबविलाll
स्वीप ॲक्टीव्हिटी अंतर्गत घेऊनी विविध स्पर्धा-योजनाl
लोकशाही व संविधान जतनसांठी पुढाकार घ्या मतदानाll