अर्थे येथे बडगुजर समाज मंडळाकडून यात्रेकरूंसाठी मोफत थंड पेयची सेवा

अर्थे ता शिरपूर येथे आज दिनांक 18 एप्रिल रोजी गावातील कुलदैवत म्हाळसा माता मंदिर परिसरात यात्रोत्सवाचे आयोजन होते. त्या निमित्ताने गाव परिसर तसेच बाहेर गावाहून हजारो भाविक आपल्या कुलदेवतेचे दर्शन घेण्यासाठी तसेच आपली मानता फेडण्यासाठी येतात. त्यांच्या सेवेसाठी या वर्षी अखिल भारतीय बडगुजर समाज मंडळाकडून यात्रेस येणाऱ्या भाविकांना मोफत थंड शितपेयची व पाण्याची सेवा देण्यात आली. आलेल्या सर्व भक्तांची तहान व थकवा मिटवण्यासाठी पाण्याची व शितपेयची मोफत सेवा समाज मंडळाकडून प्रथमच असा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमासाठी समाजातील समाजबांधवांनी आर्थिक तसेच वास्तुरुपाने मदत केली. तसेच युवकांनी यात हिरहिरीने सहभाग घेतला व सकाळी 8 वाजेपासून तर सायंकाळी 6 वाजेपर्यंत अखंड सेवा समाज मंडळाकडून पुरवण्यात आली. या उपक्रमासाठी अखिल भारतीय बडगुजर समाज मंडळातील सर्व सदस्यांनी तसेच युवक, समाजबांधव यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमाविषयी परिसरातील नागरिकांनी व आलेल्या भाविकांनी कौतुक केले.

अर्थे समाज मंडळ कार्यकर्ते थंड पेय वाटप करतांना

1 Comment

  1. अर्थेकर बडगुजर समाज मंडळाचे मनःपूर्वक अभिनंदन व धन्यवादll
    जितके महत्वाचे मतदानl
    तितकेच महत्वाचे जल पेयदानll

Leave a Reply

Your email address will not be published.


*